-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

प्रगती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप

प्रगती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप

प्रगती विद्यामंदिर शाळेत विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप

जळगाव


जळगाव प्रतिनिधी :-     मा.शालेय शिक्षण व क्रीड़ा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार विद्यार्थी व लहान बालके यांना आहार देणे आवश्यक असल्याने शहरी भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ वितरण करण्याकरिता निर्देश देण्यात आले. त्या अनुषंगाने प्रगती विद्यामंदिर शाळेत शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना समप्रमाणात वितरीत करण्यात आला. तांदूळ वितरण करीत असताना लॉकडाउन चे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्यात आली तांदूळ घेण्यासाठी आलेल्या पालकांना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या व तांदूळ वाटप करण्यात आला.यात संस्थेचे चेअरमेन तथा शालेय व्यवस्थापन समिति अध्यक्ष प्रेमचंदजी ओसवाल,शालेय व्यवस्थापन समिति शिक्षणतज्ञ मंगलाताई दुनाखे तसेच संस्थेचे सचिव सचिन दुनाखे    यांच्या हस्ते करण्यात आला
      याप्रसंगी मुख्याध्यापक शोभा फेगडे  शिक्षक सुवर्णा शिराळकर,भावना चौधरी,गौरी दीक्षित रमेश ससाने तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


advertising articles 2

-->