निलॉन्स कंपनी कडून उत्राण गावात फवारणी सुरू
एप्रिल २८, २०२०
ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांनी निलॉन्स कंपनी मध्ये झालेल्या बैठकीत व्यवस्थापक श्री.चिराग साहेब यांच्या कडे गावात सोडिअम हायप्रोक्लोराईट फवारणी करण्याची मागणी केली
उत्राण,ता एरंडोल : ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांनी निलॉन्स कंपनी मध्ये झालेल्या बैठकीत व्यवस्थापक श्री.चिराग साहेब यांच्या कडे गावात सोडिअम हायप्रोक्लोराईट फवारणी करण्याची मागणी केली आणि त्यांनी लगेच होकार देवून फवारणी करण्याचे मान्य केले आणि लगेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निलॉन्स कंपनीच्या वतीने सर्व उत्राण गावात दत्तनगर पासुन फवारणी सुरु केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री अमोल महाजन ,पुण्यनगरी वार्ताहार श्री प्रकाश कुवर, वैभव महाजन, पोलीस पाटील श्री राजेंद्र महाजन हे व कंपनी चे प्रतिनिधी अशोक चौधरी ग्रा. पं. कर्मचारी अशोक चव्हाण, विलास महाजन, राहुल महाजन उपस्थित होते. तसेच कंपनी मध्ये बाहेरून येणाऱ्या सर्व गाड्या ह्या गेट बाहेर निर्जंतूकीकरण करण्याच्या सूचना अमोल महाजन यांनी दिल्या आणि तशी स्वतंत्र व्यवस्था कंपनी प्रशासनाकडून करण्यास सांगितले.