-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...


लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलं आहे.


लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचं वेगवेगळ्या अहवालातून समोर आलं आहे. मात्र, आता देशासमोर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ठाकली आहे. गेल्या २४ तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशभरात ६० जणांचा मृत्यू झाला असून, देशभरातील रुग्णांची संख्या २९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दरम्यान, देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे ३ मे नंतर या जिल्ह्यांना लॉकडाउनपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सोमवारी झालेल्या बैठकीत तशी चर्चा झाली आहे. यात लॉकडाउन हटवण्यासंदर्भात राज्यांनी निर्णय घ्यावा, असं केंद्रानं म्हटलं आहे. 

advertising articles 2

-->