-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

राज्य महामार्ग येथील पोलीस कर्मचारी बाधीत आढळल्याने चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

राज्य महामार्ग येथील पोलीस कर्मचारी बाधीत आढळल्याने चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव


राज्य महामार्ग येथील पोलीस कर्मचारी बाधीत आढळल्याने चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

 चाळीसगाव 

प्रतिनिधी|भोजराज आमले
चाळीसगाव ता दि 29: तालुक्यातील जामडी येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता व राज्य महामार्ग येथील पोलीस कर्मचारी बाधीत आढळल्याने तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला होता या दोघांना उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या दोघांनीही कोरोनावर मात करून ते आपापल्या खरी सुखरूप पोहचले आहेत .जामडी येथील ६० वर्षीय महिला भडगाव येथे अंत्यसंस्कारासाठी गेली असता ती कोरोना पॉझिटीव आढळल्याने त्या महिलेला उपचारासाठी जळगाव येथील रूग्णालयात दाखल केले होते तसेच महामार्ग पोलीस असलेले जामनेर तालुक्यातील एक पोलीस कोरोना बाधिताच्या संपर्कात आल्याने त्यास देखील कोरीना लागण झाली होती त्यांनाही जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते . काल सायंकाळी जामडी येथील महिला व महामार्ग पोलीस कर्मचारी या दोघांचे कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह असून या दोघांनीही कोरोनाचर मात केली आहे . दोघेही आपापल्या घरी सुखरूप पोहचल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले . गावक - यानी केलेल्या स्वागतामुळे त्यांचे अश्रु अनावर झाले होते .

advertising articles 2

-->