-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; उद्धव ठाकरे सरकारनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय


  मुंबई  


कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांबाबत राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.


29 मे: कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांबाबत राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. मानधन देण्यात येईल
डॉक्टरांच्या मानधनात अशी वाढ...
-आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार
-आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार
- इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार
- इतर भागातील विशेषज्ज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये

advertising articles 2

-->