-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

ईद मुबारक हो म्हणत,मुस्लिम बांधवांनी केला रमजान ईद सण साजरा “

ईद मुबारक हो म्हणत,मुस्लिम बांधवांनी केला रमजान ईद सण साजरा “

“ ईद मुबारक हो म्हणत,मुस्लिम बांधवांनी केला रमजान ईद सण साजरा “ 

  • नगरदेवळा प्रतिनिधी 

आज मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण रमजान ईद यालाच ईद उल फितर म्हणतात. ईद उल फितर हा अरबी शब्द आहे. ईद त्याचा अर्थ आहे आनंद आणि फितर म्हणजे दान करणे. मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. मनोमनातील दरी कमी करून एकमेकांमध्ये बंधुभाव, स्नेहभाव वाढवणारा हा सण. या दिवशी मुस्लिम बांधव महिन्याभरापासून असलेला त्यांचा रोजे संपवतात आणि मशिदीत जावून एकत्र नमाज पठण करून झाल्यावर एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक असे म्हणत तसेच एकमेकांना आपल्या घरी शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात आणि सर्व मिळून शिरखुर्म्याचा आनंद लुटतात.

परंतु आजची स्थिती सर्वज्ञात आहेच कोविड १९ या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपणसोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. आणि त्यामुळेच मुस्लिम बाधवांना हा सण दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन एकमेकांना आलिंगन देवून साजरा करता येणार नसला तरी ईद दरवर्षीप्रमाणे मोठ्या आनंदात हर्षोल्हासात घरूनच साजरी करतांना दिसताय.आणि शासनाने ज्याप्रमाणे सामजिक अंतर व खबरदारीचे उपाययोजना अवलंबून ईद साजरी करतांनाचे आवाहन केले आहे त्यास प्रतीसाद देत घरीच राहून समाजाबंधावना व ईतर धर्मियानांही आपल्या शुभेच्छा देत एकतेचा संदेश देत आहे

advertising articles 2

-->