नगरदेवळा सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्राहकांसाठी पाणपोइ
नगरदेवळा :प्रतिनिधी सैय्यद दानिश
सुमारे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तप्त तापमान त्यातच भर उन्हात पैसे काढण्यासाठी ग्राहकांची होणारी गर्दी आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बंद असणारी दुकानं यामुळे खेड्यापाड्यावरून येणाऱ्या ग्राहकांना , आबालवृद्ध यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासत होती .दोन तीन दिवसांआधी येथील सेंट्रल बँकेजवळील चौक कॉंक्रीटीकरण करण्यात आले यावेळी उपसरपंच सागर पाटील व ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील यांच्या ही गोष्ट लक्षात आली .त्यांनी आज बँकेजवळ स्वतःच्या खर्चाने थंड पाण्याचे जार उपलब्ध करत पाणपोइ उभारली जेणेकरून गावातील व बाहेरगावातील लोकांची पाण्याची तहान भागू शकेल .त्यांच्या या उपक्रमाचे सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक यांनी कौतुक केले .यावेळी भिकन महाजन , निलेश पाटील ,रविंद्र महाजन उपस्थित होते .