-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू - उदय सामंत

15 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालय सुरू - उदय सामंत

 मुंबई, ०३ फेब्रुवारी: राज्यातील महाविद्यालय सुरू कधी होणार याची उत्सुकता लागली होती. याबाबत काही बैठका देखील झाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय सुरू होणार आहे. सध्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालय सुरू होणार, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

विद्यार्थी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य असली तरी यावर्षी तसं राहणार नाही याबाबत जी आर काढण्यात आला आहे, असे उदय सामंत म्हणाले. जे महाविद्यालयात येऊ शकत नाही त्यांना ऑनलाईन क्लासेसचा पर्याय उपलब्ध राहील, असेही उदय सामंत यांनी सांगितलेयुजीसी गाईडलाईन्सनुसार राज्य सरकारने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, असे उदय सामंत म्हणाले.


सध्या ५० टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरू केले जातील. तसंच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पर्याय खुले असतील. महाविद्यालयात ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक नसेल. मात्र महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना शासनानं घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करावं लागेल, असं उदय सामंत म्हणाले..


advertising articles 2

-->