कासोदा 3 दिवस कडकडीत बंद चे आदेश
मार्च २७, २०२१
प्रतिनिधी / अर्तजा मुल्लाजी
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने कासोदा 3 दिवस लोक डाऊन करण्यात आला आहे ग्रामपंचायत कासोदा व पोलीस स्टेशन कासोदा यांनी गावात दवंडी देऊन लॉक डाऊन 3 दिवस राहणार असल्याचे जाहीर केले आहे व लोकांनी लॉक डाऊन स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळावे असे आव्हान केले आहे ग्रामपंचायत कर्मचारी मधुकर ठाकूर यांनी गावात यासंदर्भात दवंडी दिली आहे दवंडी दिल्यानंतर किराणा दुकान व भाजीपाला येथे ग्राहकांनी एकच गर्दी केली