अन्न व औषध प्रशासन विभाग व स्थानिक पोलीस यांच्या संयुक्तरिक्त केलेल्या कारवाईत नऊ लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा गुटखाच्या गोडाऊनवर छापा
कासोदा प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
अन्न व औषध प्रशासन विभाग व स्थानिक पोलीस यांच्या संयुक्तरिक्त केलेल्या कारवाईत नऊ लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचा गुटखाच्या गोडाऊनवर आज दि. २० मार्च शनिवार रोजी संध्याकाळी ५:३० वा. छापा टाकण्यात आला.
कासोदा-भडगाव रस्त्यावरील धान्य मार्केटसमोरील गोपाल नगर बांभोरी शिवार येथे पत्र्याचे शेड असलेल्या आढळून आले सदर ठिकाणी हजर व्यक्तिस सदरचे गोडाऊन आमचे असल्याचे सांगितले. निलेश मधुकर चिंचोले (३३) मालक स्वतः असल्याचे सांगितले.सदर गोडाऊनची पहाणी केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधक असलेल्या अन्न पदार्थाचा साठा विक्रीसाठी आढळून आला. त्यात विमल पान मसाल्याचे एकुण ४१६० कंपनी पॅक पाकिटे प्रत्येकी किंमत १८७ असा एकुण किंमत रुपये ७ लाख ७७९२० चा साठा आढळून आला, वि- १ तंबाखू एकुण ४१६० पॅक पाकिटे प्रत्येकी असा एकुण किंमत १३७२८० चा साठा आढळून आला.दोघ मिळून एकूण साठा ९१५२०० विक्री साठी आढळून आला सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या पोलीस उपनिरीक्षक नरेश ठाकरे, पो. काॅ. जितेश पाटील, समाधान तोंडे, इम्रान खान यांनी ही कारवाई केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेश ठाकरे हे करीत आहेत. आरोपी निलेश मधुकर चिंचोले यास अटक करण्यात आली आहे.
सदर छापाबाबत गावात अनेक विक्रेते असतांना देखील एकावरच छापा का टाकण्यात आला याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत