घरावरती कागद टाकून रहाण्याची आली वेळ प्रधान मंत्री आवास योजना
जून ०७, २०२१
तांडा कुंडाणे प्रतिनिधी दिपक पवार
प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत सोमा दिनकर पवार ,तांडा कुंडाणे यांनी पाऊसमुळे घरावरती कागद टाकून राहण्याची वेळ त्यांना आली आहे या योजनेत 120000,रु एवढे अनुदान मिळत असतो आणि तो टप्याटप्याने लाभार्थीच्या खात्यात टाकला जातो परंतु सोमा दिनकर पवार व गावातील बहुतांश नागरिकांना फक्त 60000 हजार रु येवढे च अनुदान मिळाले आहे पावसाचे दिवस आहे दोनतीन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. ग्रामसेवक रोजगारसेवक यांना वारंवार सांगून ही त्यांनी चेक टाकत नाही काही उडवा उडावीचे उत्तर देऊन मोकळे होतात .त्यात ग्रामसेवक हे महिन्यातून एकदा तोंड दाखवतात त्यांना घराची पाहणी करायला वेळ नसतो मिस्टर इंडिया सारखे येतात व जातात त्यांना नागरिकांनी कॉल केल्यावर उडवा उडावीचे उत्तर देऊन मोकळे होतात कदी सांगतात दोन दिवादार चेक मिळेल तर कधी आठवडा असे सांगून मोकळे होतात त्यात सरपंचाला तर काही माहिती नाही लाभार्थी त्यांना सांगून कंटाळून शेवटी घरच्या वरती कागद टाकून राहण्याची वेळ या ठिकाणी आली आहे