-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

संजय दीक्षित यांचा विश्वकर्मा मंडळ व पुस्तक भिशी तर्फे भावपूर्ण सत्कार

संजय दीक्षित यांचा विश्वकर्मा मंडळ व पुस्तक भिशी तर्फे भावपूर्ण सत्कार

 कर्तव्यदक्ष समाजसेवक संजय प्रभाकर दीक्षित यांची विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समस्त सुतार समाज न्यू विश्वकर्मा बहुउद्देशीय मंडळ व भारतरत्न डॉक्टर ए .पी .जे .अब्दुल कलाम पुस्तक भिशी यांच्या संयुक्त विद्यमाने भावपूर्ण सत्कार दि .९जुलै २०२१ रोजी सद्गुरु नगर येथील निवासस्थानी शासकीय कोरोना प्रतिबंध नियमाचे पालन करुन  उत्साहात करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे जिल्हा प्रमुख विजय लुल्हे होते .
   राज्य उपाध्यक्ष पदी सम्माननीय नियुक्ती झाल्या प्रित्यर्थ संजय दिक्षीत यांचा  सत्कार प्रमुख अतिथी तथा समस्त सुतार समाज न्यू विश्वकर्मा बहुउद्देशीय मंडळ ज्येष्ठ सदस्य बाळकृष्ण मिस्तरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन करण्यात आला.बाळकृष्ण मिस्तरी हे संजय दिक्षित यांच्या गौरवार्थ बोलतांना  दिक्षीत यांनी पांचाळ सुतार समाजातील कौटुंबिक अत्याचार निर्मूलन तसेच कौटुंबिक कलहातून होणारे घटस्फोट थांबवून केलेल्या यशस्वी दिलजमाईच्या यशोगाथा, अनाथ व निराधार विद्यार्थी व दीनदुबळ्या समाज बांधवांना केलेल्या आर्थिक मदतीचे नि:स्वार्थी कार्य सांगितले . सत्कारार्थी संजय दिक्षित सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, " सत्कारामुळे निःस्वार्थी कार्याला गती मिळून कार्यकर्त्यांना समाज प्रतिष्ठेसह अक्षय मनोबल प्राप्त होते ".अध्यक्षीय भाषणात विजय लुल्हे यांनी संजय दिक्षित यांच्या विश्वकर्मा वंशीय समाज संघटन संस्थापक अध्यक्ष नागोजीराव पांचाळ यांच्यासह जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी असतांना समाजाच्या एकता व अखंडता वर्धिष्णूतेसाठी राज्यस्तरीय रथयात्रेत केलेले झंझावाती दौरे व वेरूळ येथे प्रतिवर्षी होणारे प्रबोधनपर राज्य मेळावे आयोजनातील भुषणावह योगदान तसेच व्हि .व्हि .एस निधी बँक प्रणाली अंतर्गत आर्थिक दुर्बल समाज बांधवांना मिळवून दिलेल्या लाभाच्या योजना व त्यासाठीचे दिक्षीतांचे अथक  व निरपेक्ष समाजकार्य सांगितले.कार्यक्रमास मातोश्री सुमन दिक्षीत, सौ.अल्का दिक्षीत, सुरेश भालेराव,विजय दिक्षीत, किरण परदेशी, जयेश दिक्षीत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  बाळू अहिरे यांचे अमूल्य सहकार्य मिळाले .आभार आयुष दिक्षित यांनी मानले .

advertising articles 2

-->