-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

कासोदा पोलिसांची अवैध गुरे वाहतुकीवर धडक कारवाई३ गायींसह मालवाहू वाहन जप्त; २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, तिघे आरोपी अटकेत

कासोदा पोलिसांची अवैध गुरे वाहतुकीवर धडक कारवाई३ गायींसह मालवाहू वाहन जप्त; २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत, तिघे आरोपी अटकेत

प्रतिनिधी : नुरुद्दीन मुल्लाजी
कासोदा, ता. एरंडोल : कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या तसेच जनावरांना वेदना होतील अशा पद्धतीने गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कासोदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत तीन गायी आणि अशोक लेलँड कंपनीचे मालवाहू वाहन असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

१४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फरकांडे गावाजवळील सहकारी दूध डेअरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. गावकऱ्यांच्या निदर्शनास गुरांची संशयास्पदरीत्या वाहतूक होत असल्याचे आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी सदर मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये तीन गायी दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये अंदाजे सात वर्षे, सहा वर्षे आणि पाच वर्षे वयाच्या तीन गायींचा समावेश आहे. तिन्ही गायींची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून, अशोक लेलँड मालवाहू 

वाहन क्रमांक MH-19-CY-3850 याची अंदाजे किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. अशाप्रकारे एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी चंद्रकांत बापू पवार (वय ४०, रा. म्हसवे, ता. पारोळा), सुरेश भावडू सोनावणे (रा. म्हसवे, ता. पारोळा) आणि राहुल गोरख वाघ (रा. खडके, ता. एरंडोल) या तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यापैकी पवार हा वाहनचालक व वाहनमालक, सोनावणे हा गायी विकणारा, तर वाघ हा गायी विकत घेणारा असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(क), ११(घ), ११(ड), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५(अ), ५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सपोनि श्रीकांत अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र पाटील, पोलीस शिपाई योगेश पाटील, लहू हाटकर आणि कुणाल देवरे यांनी केली. तपास अधिकारी पोलीस नाईक क्र. २१७३ नरेंद्र महादू पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

advertising articles 2

-->