-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

देशात सत्ता स्थापित करणे, हिच मा. काशीराम साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल -- जिल्हाध्यक्ष शांताराम जाधव

देशात सत्ता स्थापित करणे, हिच मा. काशीराम साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल -- जिल्हाध्यक्ष शांताराम जाधव
भुसावळ (राजेश तायडे)-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान, त्यांचे विचार , त्यांचा मानवतावाद , त्यांची हिच संकल्पना घेऊन बहुजन समाजाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम साहेब यांनी जम्मू कश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, देशाच्या कान्या कोपऱ्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनात रुजविण्याचे काम केले , त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात बहुजन समाज पार्टी रुजवल्यामुळे बहन मायावती ह्या चार वेळेस मुख्यमंत्री झाल्या .
 9 ऑक्टोबर दिन हा त्यांचा स्मृति दिवस असल्याकारणाने याच दिवसापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी माननीय कांशीराम साहेब यांचे विचार आत्मसात करून सत्ता प्रस्थापित करू हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शांताराम जाधव यांनी त्यांच्या अभिवादन सभेत केले.

येथील कोरोनेशन हॉलच्या पटांगणामध्ये आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत विचार मंचावर महाराष्ट्राचे प्रभारी रामचंद्र जाधव , खांन्देश पुणे झोन प्रभारी राज चव्हाण , प्रदेश सचिव किरण अल्हाट , अरुण काळे नाशिक अध्यक्ष, रमेश निकम मालेगाव, प्रा. जयमंगल धनराज बुलढाणा यांनी काशीराम साहेबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आपापले विचार प्रगट करून सभेला संबोधविले. 
यांच्यासह विचार मंचावर जळगाव जिल्हा अध्यक्ष शांताराम जाधव, नारायण अडकमोल रावेर लोकसभा अध्यक्ष, जळगाव प्रभारी राकेश वाकडे, एससी एसटी असोसिएशनचे सुधीर जंजाळे ,भारतीय बौद्ध महासभेचे सुमंगल रवींद्र अहिरे, प्राध्यापक अनिल हिवाळे , एडवोकेट सुनील पगारे, कवी सारंग पवार, पी.ओ.एच. मंडळ अध्यक्ष ईश्वर खंडारे ,मंडळ सचिव अभय आखाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते .
सभेला संबोधित करताना राज चव्हाण म्हणाले की ९ ऑक्टो हा दिवस माननीय कांशीराम साहेब यांचा श्रद्धांजली दिवस आहे, याच दिवसा पासून यूपीमध्ये होणाऱ्या २०२७ च्या निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार बहुजन समाज पार्टी तर्फे केला जाईल असे सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित केले . 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष शांताराम जाधव जिल्हा प्रभारी राकेश वाकडे विलास तायडे रविकांत बाविस्कर, उपेंद्र वाकचौरे ,अजय नरवाडे प्रिन्स गवई, भरत इंगळे ,सुशील केदारे ,मोहन चंदन , बामसेपचे सूर्या टीसी, सपकाळे सर, एम के गायन, तसेच बामसेफचे सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील केदारे तर आभार प्रगट नारायण अडकमोल यांनी केले.



advertising articles 2

-->