चिंता वाढली : महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३०२ वर, एकट्या मुंबईत ५९ रुग्ण
मार्च ३१, २०२०
चिंता वाढली :महाराष्ट्रात करोना बांधितांची संख्या 302 वर,एकट्या मुंबईत 59 रुग्ण
करोनाग्रस्तांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारतर्फे केले जात आहेत. अशात महाराष्ट्राची चिंता आणखी वाढली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आज कुठे किती रुग्ण पॉझिटिव्ह
अहमदनगर-३
मुंबई- ५९
पुणे-२
ठाणे-२
कल्याण डोंबिवली-२
नवी मुंबई-२
वसई विरार-२
पुणे-२
ठाणे-२
कल्याण डोंबिवली-२
नवी मुंबई-२
वसई विरार-२
आज सकाळपर्यंत महाराष्ट्रातल्या करनोग्रस्तांची संख्या २३० होती. मात्र आता संध्याकाळपर्यंत ही संख्या ३०२ वर पोहचली आहे. एकट्या मुंबईत एका दिवसात ५९ रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात आणि पंजाबमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. तरीही दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. देशात १३०० च्यावर करोनाग्रस्त झाले आहेत. त्यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ३०२ इतकी झाली आहे.