करोना संकट च्या मदतीसाठी राजाभाऊ मंत्री पतसंस्था 2 लाख 11 हजार 111 रुपये मुख्यमंत्री निधी देणार
प्रतिनिधी: नूरुद्दीन मुल्लाजी
कासोदा ता,एरंडोल: येथील राजाभाऊ मंत्री सहकारी पतसंस्था ची मासिक बैठक चेअरमन पांडुरंग चिंधु वाणी यांचे अध्यक्षतेखाली होऊन महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या कोरो ना महामारी ने अक्षरशः थैमान घातला आहे देशभरात लॉक डाऊन सुरू आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील लोक डाउन सुरू आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांच्यासोबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सरकारी यंत्रणा कसोशीने प्रयत्न करून कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे अशा परिस्थितीत आपण देखील या राज्याचे समाजाचे घटक आहोत या भावनेतुन राजाभाऊ मंत्री सहकारी पतसंस्थेने मुख्यमंत्री निधी 2 लाख 11 हजार 111 रुपये मुख्यमंत्री निधी देण्याचे मंजूर केले आहे या वर्षी देखील सभासदाला 15 टक्के लाभांश व 600 रुपयेमीटिंग भत्ता देण्यात येणार आहे या वर्षी देखील संस्थेला 36 लाख 90 हजार चढत्या क्रमांकाने नफा झाला आहे ही बैठक संस्थेच्या हॉल मध्ये सुरक्षित अंतर ठेवून मास लावून घेण्यात आली बैठकीला व्हाईस चेअरमन कमलबाई चौधरी ,संचालक जयप्रकाश समदाणी ,किशोर भाऊ मंत्री, शशांक मंत्री ,राजेंद्र वाणी, सलाउद्दीन अलाउद्दीन शेख ,दामू भोई दीपक भिला पाटील, जगन्नाथ सोनवण ,जिजाबाई पाटील ,जगन्नाथ धामणे ,गोकुळ शिंपी ,व्यवस्थापक संजीव नवाल कर्मचारीवृंद उपस्थित होते