जवखेडे सिम येथील लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांनी तळई येथील गावठी दारू विक्रेत्यांना पकडून दिला चोप
एप्रिल १५, २०२०
तळई परिसरात गावठी दारू विक्रीत्याना दिनेश बापू आमले लोकनियुक्त सरपंच जवखेडे सिम यांनी पकडून पोलोसांच्या हवालदिल केले
एरंडोल,तळई : काल्या आणि म ऱ्या दोघे तळई येथील असून दोघे जवखेडे सिम शिवारात पाटाच्या चारी जवळ गावठी दारू विक्री करत होते, लोकनियुक्त सरपंच जवखेडे सिम दिनेश बापू आमले पाचोरा येथे घरी जात असता रस्त्यात 100 एक लोकांची गर्दी दिसली काय चालू आहे बघितले तर सर्व दारू पिणारे लोक पळत सुटले ,दारू विक्रेते यांनी दुरूनच बघून दारू खाली ओतून दिली कमीत कमी 200/250 लिटर दारू होती त्यांनी तिथून पळ काढण्या चा प्रयत्न केला त्यांचा पाठलाग करून लोकनियुक्त सरपंच यांनी त्यांना चोप दिला व कासोदा पोलीस स्टेशन ला जाऊन कळवले व त्यानंतर त्या दोघांना पोलीस यांनी कासोदा पोलीस स्टेशन ला आणले, ,जवखेडे सिम येथे 20 वर्षे पासून दारु बंद आहे, आणि हे विक्रेते जवखेडे सिम शिवारात विक्री करत आहे त्या मुळे लीकनियुक्त सरपंच दिनेश बापू चांगलेच संतापले, कोरोना च्या पार्शवभूमीवर दारू कसं काय चालू आहे? येवडी गर्दी कशी जमा झाली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत तरी गावठी दारूच्या बहुतांश विक्री चाललेली आहे तरी प्रशासनाने व गावातील पोलिस पाटील यांनी लक्ष द्यावे असे दिनेश बापू आमले यांनी सांगितले
