-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

दुःख निर्वासितांचे कसे पहावे- प्रा.उमेश सूर्यवंशी

दुःख निर्वासितांचे कसे पहावे- प्रा.उमेश सूर्यवंशी

दुःख निर्वासितांचे कसे पहावे-प्रा.उमेश सूर्यवंशी



जि.जळगाव,एरंडोल : आज सकाळी भयानक चित्र पाहुन अंगावर काटे आले,..जगावर आलेल्या "कोरोणा " महामारी मुळे सामान्य गोर-गरिबांना काय सोसावे लागत आहे.याच प्रत्यदर्शी चित्र मी सकाळी पाहिले.परिस्थिती किती गंभीर आहे कि अशा कितेक कुटुंब या महामारी ने त्रस्त होवुनी..बळी पडत आहे,उपासमारी ची वेळ आज या वाटसरु वरती आली आहे.काय करणार ,? हे दुःख ते कोणाला सांगणार...?कोण येईल धावुन त्यांच्यासाठी.. आज, दुःखाचे हाल अपेष्ठांचे चक्र जणु यांसारख्या कितेकांच्या जीवनात उद्धवस्त करण्यासाठी फिरत आहे.अगोदर जीवनाचे चटके का कमी होती जे आज अजुन मैलो-मैल खाली पायी चालत चटके त्यांना खावे लागत आहे. जीवनाच्या या काटेरी रस्त्यावर दुःखाचे जुन किती संघर्ष करुन निवारा..गाठायचा तो पण मिळेल का नाही या विवंचेणे मनाला प्रश्न विचारणं ...खरंच किती अवघड आहे.आज खुप जण दानशुरांचे हात देण्यासाठी पुढे आले.पण खरे तर ते मदतीचे हात या वंचिता न पर्यंत पोहचले का..? याचा विचार



केला कधी,आज सर्व प्रशासकीय वर्ग ,प्रतिष्ठित व्यक्ती ,तसेच नामवंत संस्था या दुःख ला सावरण्यासाठी,मदतीने एकत्र होवुन काम करत आहे.आरोग्य कर्मचारी ,पोलीस इ.सर्व देवरुपी माणसं आपल्या कर्तव्यासाठी  जीवाची पर्वा न करता अहोरात्र  झटत आहे. त्यांना तर माझा सलाम...परंतु आज काहीजण सरकारच्या निर्णयाला असमर्थनता दर्शवत आहे.याचे खुप दुःख वाटते.ते एकटेच काहीच करु नाही शकत.आपल्या सर्वांना एकत्र मिळुन,आदेशांचे पालन करुन सहकार्य करायला हवे. तरच आपण या महामारीला हरवु शकतो.अन्यथा नाही......तसेच अशी कितीतरी चित्रे मन हेलावुन ठाकणारी दृश्य आपण आज दिवसेंदिवस  बघत आहोत. काय करणार ..? कसं करता येईल ..? याचा विचार आपण सर्वांनी नक्की करावा. मैलो न मैल चालणारे " पाय " आपली घरांची आज वाट शोधताना दिसत आहे.ओढुनी सोबत कुटुंबाचा भार घेवुनी सोबतच त्यांच्या कडेवर असणारी लहान-लहान बाळे..खाली चप्पल न घालता,नाजुक पायांनी कितीतरी मैल चालताना..जणु काही या आशेन मागे फिरुन पहाता ..कि कोणतरी घासभर भाकर द्यावी...याठिकाणी दृश्य पाहुन जणु निशब्द...च होतो...आज जग चंद्रावर ,मंगळावर,ग्रहांवर आपले अस्तित्व
निर्माण करण्याचे स्वप्न आपण रंगवतोय..पण आज आपल्या लाच स्वतः च अस्तित्व टिकवने या पृथ्वीवर अवघड बनले आहे हि कृत्य मानवीरुपी तर नाही ना?????याचा गहाळ लपलेल आहे. आज सर्व प्रार्थना स्थळे बंद झाली पण आज माणुसकीची दारं उघडी करुन... पोलीस ,दवाखाने  इतर काही सेवाभावी लोक यांच्यातच दैवरुप दिसत आहे.उघड्या वरचा हा संसार घेवुन वनोवन भटकंती या निरर्वासितांना करावे लागत आहे .मिळेल तिथे थोडा आसरा घेवुन,थोडाफार मिळाला कधी घास,घोटभर पाणी....नाही तर खाली पोटीच,राहुन हजारो-मैलअंतर गाठावे लागत आहे.या जगाला ह्या विषाणु ने पुन्हा


एकदा आठवण  या आपल्या  " संविधाना" ची-धर्मनिरपेक्षता,सार्वभौम ,समानता ,तत्त्वांची जाणतर देतोय..कि माणसापेक्षा ...कुठलाच जात-धर्म -पंत श्रेष्ठ नाही. तसेच स्वच्छतेची  शिस्तबद्ध ,नियमांची, एकत्रितपणे वागण्याची आणि सहाय्यताची शिकवण पण देत आहे.पण माणुसकिच्या सिमा ह्या अजुन लांब होताना दिसताय...,याला विज्ञानाचे श्राप म्हणावे,कि वरदान ????? यांचा संभ्रम आहेच....मी हे नाही म्हणत कि,सर्वतोपरी मदत करावी...हे सांगातो कि ज्या पद्धतीने मदत करता आली जिथे आहेत त्याच ठिकाणी राहुन  निसंकोच पणे आपला मदतीचा हात नेहमी पुढे ठेवावा.एक वाक्य छान वाचलं - "" कसुर तो पासपोर्ट का था नजनाब लेकिन सजा तो राशन कार्ड को मिली..."" खुप महत्त्व पुर्ण जीवनाचे सत्यता सांगणारे हे वाक्य खरेच आहे.परंतु हे ही म्हणावे लागेल कि एकाच गोष्टीच्या  मागे न पडता आहे त्या परिस्थितीला  सामोरे जावुन त्याला कसे आटोक्यात आणता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा.आज हि वाईट वेळ जी जीवनाचे खरे रहस्य मयी गुढ बाहेर काढुन गेली. "माणसातला मी पणा " सारण्याची हि शिकवण देत आहे.म्हणून जे माणुसकी या नात्याने करता आले तर नक्कीच करा...थोर सांगुन गेले... ."देणाऱ्या देत जावे..." ह्या वाक्यात खुप सरळता आहे...शेवटी एवढेच कि.." काळजी घ्या....निरोगी रहा...व सोबत सानिध्यालाही राहु द्या....आदेशान्वये सर्व खबरदारी व एक समजुतदार, जागृत नागरिकांचे कर्तव्ये बजवावे.......मित्रानो...
     
                                   धन्यवाद ....!

                                      लिहणार  :~  उमासुर्य.......

advertising articles 2

-->