गरीब महिलांसाठी आनंदाची बातमी! जन धन खात्यात 'या' तारखेला जमा होतील पैसे
एप्रिल ०३, २०२०
गरीब महिलांसाठी आनंदाची बातमी! जन धन खात्यात 'या' तारखेला जमा होतील पैसे
प्रजा प्रतिनिधी: कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या दरम्यान मोदी सरकारकडून एक दिलासा दायक बातमी समोर येतेय. नागरिकांच्या जन धन योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या महिलांच्या खात्यामध्ये सरळ सरळ पैसे टाकण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून याबाबत माहिती दिली गेली होती आणि आता खात्यांमध्ये पैसे जमा करण्याच्या तारखेबद्दलही माहिती समोर आलीय.
जन धन खात्यांना मोदी सरकारनं आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान एका योजनेअंतर्गत उघडलं होतं. देशातील गरीब आणि अधिकाधिक नागरिकांना बँकिंग व्यवस्थेसोबत जोडण्याचा या योजनेता हेतू होता. ज्या नागरिकांचे आतापर्यंत बँकेत खाते नाहीत, अशा व्यक्तींचे बँक खाते काढले गेलेत.
अर्थमंत्र्यांनी केली होती घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात गरजवंतांना फायदा मिळण्यासाठी जन धन अकाऊंटमध्ये जवळपास ३ महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला ५०० रुपये टाकण्याची घोषणा केली होती. यामुळे जवळपास २० कोटी महिलांचा याचा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. आता पंतप्रधान मोदींकडून या खात्यांमध्ये रक्कम जमा कधी केली जाईल याची घोषणा करण्यात आलीय.
कोणत्या खात्यांमध्ये कधी येईल रक्कम
० किंवा १ अखेरचा अंक असलेल्या अकाऊंट्समध्ये २ एप्रिलला सरकारनं रक्कम टाकली आणि ते पैसे ३ एप्रिलला खातेधारकांना मिळेल. याच पद्धतीनं २ किंवा ३ अखेरचा अंक असलेल्या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये ३ एप्रिल, ४ किंवा ५ अखेरचा अंक असलेल्या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये ४ एप्रिलला, ६ आणि ७ अखेरचा अंक असलेल्या खातेधारकांच्या अकाऊंटमध्ये ५ एप्रिलला आणि ८ आणि ९ अखेरचा अंक असलेल्या खात्यांमध्ये ६ एप्रिलला ही रक्कम जमा केली जाणार आहे.
या दरम्यान, पैसे काढण्यासाठी बँकेत लोकांची खूप गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला तयारी करण्याचे आदेश सरकारकडून दिले गेले आहेत. लोकांनाही विनंती केली जातेय की, त्यांनी बँकेत गर्दी करू नये, एकत्र जवळ उभं राहू नये. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.