अमळनेर शहराला पाणीपुरवठा अपूर्ण पडू नये म्हणून नगरपालिकेने पहिले आवर्तन घेतले असून हतनूर धरणातून 5 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याची माहिती माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दिली
अमळनेर प्रतिनिधी/ सत्तार खान
अमळनेर शहराला तापी नदीवरून जळोद डोहातून पाणीपुरवठा केला जात असून 20 मे पर्यंत पाणीसाठा पुरणार होता नागरिकांना उन्हाळ्यातही नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि कोरोनाच्या बचावासाठी नागरिकांना वारंवार हात धुण्यासाठी व आंघोळीसाठी भरपूर पाणी लागत असल्याने पुरेसा पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांना दुसरे आवर्तन घेण्याचे आदेश दिले त्यानुसार दुसरे आवर्तन 17 रोजी सायंकाळी 6 वाजता हतनूर धरणातून सोडण्यात आले हातनूर धरणातून 60 तासात चहार्डी , घाडवेल मार्गे पाटचारीतून तापी नदीपर्यंत पोहचेल सुमारे 105 किमी प्रवास पूर्ण करून तीन दिवसात पाणी जळोद डोहापर्यंत पोहचणार आहे हतनूर धरणाच्या कालव्याच्या दीड मीटर उंचीच्या प्रवेश द्वारातून पाणी सोडण्यात आले 24 तासात 1 दशलक्षघनमिटर पाणी धरणातून बाहेर पडणार आहे त्यामुळे जून महिना संपेपर्यंत पाणी पुरणार आहे अमळनेर शहराला पाणी टंचाई भासणार नाही कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन झाले तरी नगरपालिकेने दोन आवर्तने राखून ठेवण्यात आली आहेत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे , गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंता शिंदे , उपअभियंता निकम यांनी तात्काळ आवर्तन सोडल्याने नगरपालिकेने आभार मानले आहे