-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेरात 6 जून पर्यंत जनता कर्फ्यू

अमळनेरात 6 जून पर्यंत जनता कर्फ्यू

अमळनेरात 6 जून पर्यंत जनता कर्फ्यू

 ता अमळनेर 
 अमळनेर प्रतिनिधी
 शहरात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असताना ही संचारबंदी पाळत नसल्याने लोकप्रतिनिधी व प्रशासन कडून दिनांक 31 मे ते 6 जून पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्याच्या मोठा निर्णय घेण्यात आला आहे दिनांक 31 मे ते 6 जुन पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात यावा अशी माहितीची ध्वनीक्षेपकाचे वाहनाद्वारे शहरात कळविण्यात येत आहे हा निर्णय लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्र बैठकीत घेतला आहे या काळात कृषी संलग्न दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने व सेवा बंद राहतील अशी माहिती देण्यात येत आहे अमळनेर येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 119 वर पोहोचली आहे नागरिकांना त्यांचे गांभीर्य अद्याप कळून येत नसल्याचे चित्र शहरभरात दिसून येत होते जिल्ह्यासह तालुका रेड झोन मध्ये असतानाही जनतेच्या व व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनाकडून संपूर्ण शहर सुरू करण्याची ची परवानगी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून मिळविली होती मात्र शुल्क कारणासाठी दररोज बाजारात नेहमीसारखीच गर्दी होत होती व्यवसायिक व नागरिक स्वतःचे आरोग्याची काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले हा जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे आव्हान प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे•

advertising articles 2

-->