-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

मनोज भालेराव यांना अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

मनोज भालेराव यांना अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

मनोज भालेराव यांना अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर



जळगाव प्रतिनिधि:

जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार 2020 या सोहळ्यात शैक्षणिक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार मनोज भालेराव यांना जाहिर करण्यात आला आहे.ते प्रगती विद्यामंदिर येथे शिक्षक असून विद्यालयात विद्यार्थ्यांचे सर्वांगीन विकास करण्याचे उद्धिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर घेतले आहेत.कृतितुन शिक्षण यावर भर देत त्यांनी विज्ञान व भूगोल या विषयातील संकल्पना मैदानावर आकृतिद्वारे मांडून उपक्रम सादर केले आहेत,वृक्षारोपण,राखी बनवणे,साबण बनवणे,विज्ञान कृतीतून,प्रदूषण रहित दिवाळी, प्लास्टिक बंदी बाबत, व विद्यार्थीची पटसंख्या वाढ होण्यासाठी व १००% हजेरी या करिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत त्याच बरोबर हस्तलिखित तयार करेन  वर्तमानपत्र कात्रण संकलन उपक्रम, जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन, टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी मार्गदर्शन, स्वतंत्र सेनानी व महापुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्यांची माहिती देणे, क्रीडा व निबंध असे विविध स्पर्धा, मार्गदर्शन तसेच कार्यक्रमाचे  उत्कृष्ट असे नियोजन  करून उपक्रम राबविले आहेत. त्यांचा एक कवितासंग्रह प्रकाशित असून वर्गाचे तिन हस्तलिखित प्रकाशित आहेत.त्यांचा समाजसेवी उपक्रमांमध्ये पण सक्रिय सहभाग असतो.त्यांना या अगोदर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्काराने त्यात आणखी एक भर पडली आहे. त्यांना 31 मे 2020 रोजी एम जे कॉलेज समोर जळगाव येथे सन्मानित करण्यात येणार आहे.आदर्श पुरस्कार जाहिर झाल्यामुळे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल व अध्यक्षा मंगलाताई दुनाखे,शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे,शिक्षकवर्ग,पालकवर्ग तसेच म.रा.शि.संघटनेचे पदाधिकारी  तसेच सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे.

advertising articles 2

-->