कासोद्यात कोरोना चा रुग्ण असल्याच्या अफवेला उधाण
मे १७, २०२०
कासोद्यात कोरोना चा रुग्ण असल्याच्या अफवेला उधाण - आरोग्य सेेतू ऐप्लिकेशन चा उपयोग योग्य व्हावा एरंडोल ता वैद्यकिय अधिकारी- डॉ फिरोज शेख
कासोदा ता. एरंडोल प्रतिनिधी
ता,एरंडोल कासोदा:- जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूनने एरंडोल तालुक्याच्या चारही बाजूंनी कोरोना सारख्या महामारी संसर्गजन्य आजाराने वेढा दिला असून अजून पर्यंत एरंडोल तालुक्यात एकही कोरोना रुग्ण मिळून आलेला नसला तरीही तालुक्यातील कासोदायेथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सविस्तर वृत्त असेकी केंद्र व राज्य सरकारने आपल्या परिसरात कोरोना पेशंट आहे किंवा नाही याची आपल्याला माहिती मिळावी म्हणून मोबाईल मध्ये प्ले स्टोअर्स अँप मध्ये आरोग्य सेतू नावाचे एक आँपलिकेशन सुरू केले आहे. त्याचा जास्त प्रमाणात वापर एरंडोलकर करत असून त्यात एक कोरोना विषाणूचा एक पोजिटीव रुग्ण असल्याचे स्पष्ट दिसत आहे .
यावर एरंडोल तालुका वैद्यकिय अधिकारी यांच्या शी
सविस्तर चर्चा केली असून डॉ.फिरोज शेख यांनी प्रजा न्युज च्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले की त्या आपलिकेशन चा उपयोग योग्य व्हावा म्हणून वापरकर्त्यांनी आरोग्य सेतू आपलीकेशन सुरू करतेवेळी तेथील पूर्तता योग्य भरावी ... कोणीतरी एकाद्या युजर्सने माहिती अपूर्ण भरली असल्याने ते चुकीची माहिती दर्शवत आहे .यावर कोणीही घाबरून राहू नका स्वतःची काळजी घ्या व विनाकारण घराबाहेर निघू नका शासन व प्रशासनास सहकार्य करावे . आरोग्य यंत्रणा आपल्या सेवेतच आहे