पारोळा येथे १६ जण इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तर ५ बाधितांवर उपचार सुरू
मे ३१, २०२०
पारोळा येथे १६ जण इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तर ५ बाधितांवर उपचार सुरू
पारोळापारोळा प्रतिनिधी : दिलीप सोनार
पारोळा--येथील शासकीय आय. टी. आय. या कोविड सेन्टर मध्ये ४ बाधीत रुग्ण व बाधीत रुग्णाच्या संपर्कातील एकूण १६ नातेवाईकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे यांनी दिली.यात पाठक गल्ली येथीक एक शिक्षक हा चोपडा येथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नातेवाईकांच्या अंत्ययात्रा साठी गेले असता. प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी त्या शिक्षकाला शासकीय आय. टी. आय. येथे इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले आहे. वे
ल्हाणे ता पारोळा येथील १३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह मुलगा मोंढाळे येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी गेला असता. तो ५ नातेवाईक व एक सलून दुकानदाराने या पॉझिटिव्ह मुलाची कटिंग केली होती. तो सलून मालका सह नातेवाइकांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तर ओतार गल्लीतील ५७ वर्षीय कामगार हा पॉझिटिव्ह निघाला त्याचे कुटुंबातील ६ सदस्य ,ज्या दुकानावर काम करीत होता. त्या दुकानावरील संपर्कात आलेले २ कामगार , व ज्या रिक्षा चालकाने त्या बाधीत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये सोडले होते. तो रिक्षा चालक असे एकूण ९ जणांना ही इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश साळुंखे यांनी दिली.