चिंचोलीत घरात आदर्श विवाह संपन्न
जळगाव प्रतिनिधी
चिंचोली,ता,जि जळगाव :- येथे दि १५ मे रोजी शेळके व गायकवाड परिवारात कोरोनाचा जागतिक संकट लक्षात घेता कुठलाही गाजा वाजा,पत्रिका,फोटो ग्राफर न ठेवता.असाच एक आदर्श घ्यावा असा विवाह बंधनात वर राहूल वधू आर्चना यांचा दोघ कुटूंबातील चार लोकामध्ये सोशल डिस्टटींगचे पालन करत स्व:ताच्या घरात पार पडला. एक अदृश्य अशा विषाणूशी आपले युध्द आहे आणी घरात राहूनच आपण युध्द जिंकू शकतो असा संदेश या आदर्श विवाहाने करुन दिला.कोरोना मुळे सगळ्याच्या अपेक्षावरती पाणी फेरले आहे.असेही आपला समाजात राहुल व अर्चना सारखे व्यक्ति असतात की ते या संकटकाळात न डगमगता त्यांला सामोरे जाऊन एक आदर्श निर्माण करतात.