पारोळा पालिकेतर्फे दिव्यांगांना 4 लाख 30 हजार रुपये मंजुर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाकडून नगराध्यक्ष करण पाटील यांचे कौतुक व आभार
मे १६, २०२०
पारोळा पालिकेतर्फे दिव्यांगांना 4 लाख 30 हजार रुपये मंजुर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवाकडून नगराध्यक्ष करण पाटील यांचे कौतुक व आभार
प्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
गेल्या अनेक दिवसापासून दिव्यांग बांधवांनी पालिकेच्या जनरल फंडातून 5% मदत मिळावी अशी मागणी केली जात होती मदत मिळावी या मागणीला अनेक तांत्रिक अडचण येत होत्या परंतु नगराध्यक्ष करण पाटील व सर्व नगरसेवक यांनी पाठपुरावा करीत अखेर पालिका हद्दीतील एकूण 96 दिव्यांग बांधवांना 4 लाख 30 हजार रुपये मंजूर झाले आहेत लॉक डाऊन च्या परिस्थितीत दिव्यांगांना मदत मिळत असल्याने अनेकांनी नगराध्यक्ष व व नगरसेवकांचे जिल्हाभरातून कौतुक व आभार मानले जात आहे नगरपालिकेने दिव्यांग बांधवा ची माहिती मागवली असता एकूण 104 दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली यात 82 जणाचीऑनलाईन नोंदणी झाली उर्वरित 22 जणा चे कागदपत्रे अपूर्ण असल्याकारणाने त्या दिव्यांग बांधवांनी कागदपत्रे ची पूर्तता पालिकेकडे करावी त्यांनादेखील मदतीचा लाभ मिळणार आहे अपंगाच्या टक्केवारी नुसार मदत खात्यावर जमा एकूण 82 दिव्यांग बांधवांना अपंगाच्या टक्केवारी नुसार मदत मिळणार आहे यात 80 ते 100 टक्के अपंगत्वास असे 18 दिव्यांगा स 8 हजार 60 ते 80 टक्के असे 15 दिव्यांगास 6 हजार 40 ते 60 टक्के असे एकूण 49 दिव्यांगा स 4 हजाराची मदत पालिकेकडून दिली जाणार आहे ही मदत त्यांना थेट बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे दिव्यांग बांधवांनो पारोळा नगरपालिकेकडून त्यांच्या हक्काच्या अनुदान मिळाल्याने पारोळ्याचे लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष कारण दादा पाटील यांचे जिल्ह्यातील अपंग संस्थांकडून अभिनंदन होत आहे