-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची वार्षिक सभा उत्साहात ऑनलाईन संपन्न...

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची वार्षिक सभा उत्साहात ऑनलाईन संपन्न...

हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनची वार्षिक सभा उत्साहात ऑनलाईन संपन्न...

 सामाजिक 
प्रतिनिधी नूरुद्दीन मुल्लाजी
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धा वगळता कोरोना विषाणू च्या संसर्गचा धोका लक्षात घेता या वर्षीचे सर्व उपक्रम रद्द!
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे कोरोना च्या प्रार्दुभाव मुळे शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून गोरगरीब मुलांना पाच हजार रजिस्टर, वह्या आणि पेन  इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा मानस!

सिल्लोड- हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन ची वार्षिक सभा 28 मे 2020 रोजी ऑनलाईन गुगल मीट आणि व्हाट्सएप ग्रुप कॉल च्या माध्यमातून  हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक शेख अब्दुल रहीम सर यांच्या अध्यक्षतेखाली  खेळी मेळीच्या वातावरनात उत्साहात ऑनलाइन संपन्न झाली...शेख अब्दुल रहीम सरांनी सर्वांना पहिल्यादा फाउंडेशन चे मागील कार्याचा आढावा घेतला आणि  नंतर सर्वानुमते प्रामुख्याने राज्य व जिल्हा कार्यकरिणी ची या वर्षाकरिता 'जैसे थे' ठेवण्यात आली. नंतर औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी शेख यासेर यांची तर सय्यद ताजीम सर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या नंतर खालील मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. 

या वर्षीचा ईद मिलन कार्यक्रम कोरोना विषाणू च्या प्रार्दुभाव लक्षात घेता सर्वानुमते रद्द करण्यात आला.
या वर्षी चे सर्व उपक्रम सर्वानुमते रद्द करण्यात आले आहे.
कोरोना च्या प्रार्दुभाव लक्षात घेता गोरगरीब वर्गाच्या मुलांना आर्थिक अडचणी असल्याने शिक्षणात अडचणी येऊ नये म्हणून येत्या शैक्षणिक वर्षात 5 हजार वह्या, रजिस्टर आणि पेन वाटप करण्याचा मानस सर्वानुमते करण्यात आला.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अडचणी सोडवण्यासाठी लवकरच एक हेल्प लाईन सुरू करण्यात येईल.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा चा सर्व काम शेख अब्दुल रहीम सर पाहणार आहे आणि आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा करिता उर्दू आणि मराठी निवड समिती नेमण्यात आली आहे व सर्वधिकार त्यांना देण्यात आले आहे. मराठी माध्यमाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अमोल कुलकर्णी तर उर्दू माध्यमाच्या आदर्श शिक्षक साठी शफीक पठाण सर यांची निवड समिती प्रमुख पदी निवड करण्यात आली.
या वर्षीचा वित्त अहवाल ही सादर करण्यात आले आणि पुढील वर्षांसाठी नियोजन आणि रूपरेखा आखण्यात आले.
या वर्षी होणाऱ्या पदवीधर मतदार संघांच्या निवडणूक होणार आहे याबाबत कोणाला पाठिंबा द्यायचे की स्वतः उमेदवार उभा करायचं हे लवकरच सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल व जाहीर रित्या कळविण्यात येईल.

तसेच चालू शैक्षणिक वर्षात सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम सर्व रद्द करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. फक्त आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय निबंध स्पर्धा  घेण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल चर्चा करून सर्वानुमते ठराव घेण्यात आले. नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष शेख यासेर आणि जिल्हा उपाध्यक्ष पदी सय्यद ताजीम सर  यांना सर्वांच्या अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या ऑनलाईन मीटिंग चे नियोजन जिल्हा अध्यक्ष डॉ. सोहेल नवाब यांनी केले होते तर या वेळी  राज्य अध्यक्ष तथा संस्थापक शेख अब्दुल रहीम सर,राज्य सचिव शेख शब्बीर , राज्य कार्याध्यक्ष शफीक पठाण सर, कायदेशिक सल्लागार ऍड.इरफान खान, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद ताजीम सर, जिल्हा कार्याध्यक्ष शेख यासेर , राज्य सदस्य शाहरुख पठाण,तालुका अध्यक्ष शेख ईलयास, तालुका उपाध्यक्ष  तथा राज्य सदस्य शेख जफर , राज्य कोषाध्यक्ष शेख शकुर ,राज्य सह सचिव शेख साबीर ,शहराध्यक्ष जुनेद कुरेशी , शेख समीर ,शेख इसाक सह आदींची ऑनलाईन उपस्थिती होती. जिल्हा अध्यक्ष डॉ.सोहेल नवाब यांच्या आभार प्रदर्शनंतर मीटिंग समाप्त झाली...

advertising articles 2

-->