-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

आजची ईद कधीं न पाहिलेली ईद कोट्यावधीच्या उलाढाल नाही ईदगाह वर नमाज नाही शीरखुर्मा च्या आस्वाद नाही

आजची ईद कधीं न पाहिलेली ईद कोट्यावधीच्या उलाढाल नाही ईदगाह  वर नमाज नाही शीरखुर्मा च्या आस्वाद नाही



आजची ईद कधीं न पाहिलेली ईद कोट्यावधीच्या उलाढाल नाही ईदगाह  वर नमाज नाही शीरखुर्मा च्या आस्वाद नाही

 प्रतिनिधी /  नूरुद्दीन मुल्लाजी

 इतिहास साक्षी आहे कधीच अशी ईद संपन्न झालेली नाही ईदला नवीन कपडे नाही ईद गाह वरनमाज पठाण नाही ,गळाभेट नाही ,शीरखुर्मा च्या आस्वाद नाही ,घरीच नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने ईद साजरी केली
प्रत्येक वर्षी ईदच्या सणासाठी कोट्यावधी ची उलढाल होत होती मात्र यंदा कोरोना च्या पार्श्वभूमीवर बाजारात मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी दिसलीच नाही शीरखुर्मा साठी लागणारा ड्रायफ्रूट खरेदी करण्यासाठी लहान मुलाच्या आग्रहास्तव काही महिला किरकोळ खरेदी करून समाधान मानताना दिसत होते लॉक डाऊन असल्याकारणाने मजूर लोकांना काम नाही उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली मुस्लिम बांधवांनी ईद चा खर्च न करता आपल्या समाज बांधवांना सरळ हाताने मदत केली व ईद साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या निर्णय घेतला या निर्णयाच्या  प्रशासनाकडून व हिंदू बांधवांकडून त्यांचे कौतुक होत आहे आपल्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी तसेच हिंदू बांधवांनी ही व नेतेमंडळींनी आपापल्या कार्यकर्त्यांना मेसेज द्वारे व फोन करून शुभेच्छा दिल्या

advertising articles 2

-->