-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

दिलासा दायक बातमीभडगांव शहरातील पुन्हा ८ रुग्ण कोरोना मुक्त भडगांव शहरासह तालुक्यातील एकुण ४६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

दिलासा दायक बातमीभडगांव शहरातील पुन्हा ८ रुग्ण कोरोना मुक्त भडगांव शहरासह तालुक्यातील एकुण ४६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

भडगांव शहरातील पुन्हा ८ रुग्ण कोरोना मुक्त भडगांव शहरासह तालुक्यातील एकुण ४६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

 ता भडगाव 
नगरदेवळा प्रतिनिधी :-सैय्यद दानिश
 भडगाव शहरातील दत्त मढी गल्ली, कासार गल्ली,बालाजी गल्ली,सय्यद वाडा येथील ८ रुग्णांना आज दि. ३० रोजी उपचार पूर्ण झाल्याने  डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. तसेच त्यांना १४ दिवस होम कॉरन्टांइन राहण्याची नोटीस देखील देण्यात आली आहे.
 आता पर्यंत भडगाव तालुक्यात एकूण ७२-कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी-३ रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे तर ८ बाधितांना आज उपचार पूर्ण करून सुट्टी देण्यात आली आहे भडगांव शहरासह तालुक्यातील एकुण ४६ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे.

भडगांव वासियांसह  तालुक्याला दिलासा मिळाला आहे.उर्वरित कोरोना बधितां पैकी १४ जण भडगाव येथे तर ९ बाधित जळगाव येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहेत. भडगाव शहरासह तालुक्यातुन आजपर्यंत एकुण ५१० रुग्णांचा स्वॅप तपासणीसाठी घेण्यात आला होता त्यापैकी ७२ रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे तर ४०५ सशंयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच ३३ सशंयित रुग्ण कॉरंन्टाइन असुन त्यांचा अहवाल अप्राप्त आहे. त्यांचा अहवाल आज- उद्या येणाची शक्यता आहे.

यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार माधुरी आंधळे, पोलिस निरिक्षक धनंजय येरूळे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पकंज जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील, पाचोरा वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, डॉ. प्रतिक भोसले डॉ.पुनम सांगवीकर, डॉ.निलेश पाटील, नायब तहसिलदार रमेश देवकर, पो.ना. लक्ष्मण पाटील, ड्रायव्हर विष्णू तायडे, ड्रायव्हर अनिल आगोणे उपास्थित होते तर वैद्यकीय पथकातील श्रीकांत मराठे, ज्योती चौधरी, प्रमोद सतुके, डि.वाय.पाटील, किरण राठोड, मनोज वाघ, भैया महाजन,कुणाल कोळी, तसेच गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी जहिर सर,वसिम सर,ईसाक मालीक यांनी कोविड सेटंरला आपले मोलाचे योगदान देत कार्य करीत आहे तर भडगांव डॉक्टर आसोशियशनचे हि भडगांव कोरोना सेंटरला मोलाचे सहकार्य लाभत आहे.

तरी लॉक डाऊनच्या शिथिलतेत नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावे,मास्क लावावे व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

advertising articles 2

-->