लॉक डाऊनमुळे 1,2 कोटी दारिद्र रेषेखाली जाणारवर्ल्ड बँकचा भारतातील टाळेबंदी च्या संभाव्य परिणामवर अहवाल आर्थिकदृष्टी
मे ३०, २०२०
लॉक डाऊनमुळे 1,2 कोटी दारिद्र रेषेखाली जाणारवर्ल्ड बँकचा भारतातील टाळेबंदी च्या संभाव्य परिणामवर अहवाल
आर्थिकदृष्टीप्रतिनिधी / नूरुद्दीन मुल्लाजी
कोरोना व्हायरस मुळे जितकी हानी होईल त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने अप्रत्यक्ष नुकसान होणार आहे देशातील 1, 2 कोटी लोकसंख्या लॉक डाऊनलोड भीषण दारिद्र्याच्या खाईत लोटली जाणार असल्याची जागतिक बँकेने अहवालात म्हटले आहे जगात 5 कोटी लोक महा दारिद्री होणार असून त्याचा जास्त परिणाम भारतात होणार आहे गरीबी निर्मूलनासाठी देशात दशकात जितके काही काम झाले ते काही महिन्यातच धुतले जाईल भारतात जितके लोक कोरोना मुळे मरतील त्यापेक्षा जास्त भुकेने मरतील 10 ,4 कोटी भारतीय जागतिक बँक कडून अल्प मध्यम उत्पन्न देशासाठी निश्चित केलेल्या प्रतिदिन 3 ,2 डॉलर 240 रुपये दराच्या रेषेखाली जातील
12 ,2 कोटी भारतीय एप्रिलमध्ये बेरोजगार
एकट्या एप्रिल महिन्यात 12,2 कोटी भारतीय बेरोजगार झाले खाजगी क्षेत्रातील थिंक टँक असलेल्या सेंटर फार मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी (सी एम आय आय) या संस्थेने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे रोजंदारी कामगार आणि लहान व्यवसायात काम करणाऱ्या कामगारावर जास्त परिणाम झाला