-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एरंडोल व पारोळा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक त्वरित घेणार आमदार चिमणराव पाटील

एरंडोल व पारोळा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक त्वरित घेणार आमदार चिमणराव पाटील

एरंडोल व पारोळा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक त्वरित घेणार आमदार चिमणराव पाटील


 ता,पारोळा 

प्रतिनिधी /  नूरुद्दीन मुल्लाजी
लॉक डाऊन मुळे बहुतेक शासकीय कामांना अडचण येत आहे त्यामुळे लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहत आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा अपंग श्रावण बाळ योजनेअंतर्गत वयोवृद्ध महिला पुरुष तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व इंदिरा गांधी विधवा योजना अंतर्गत एरंडोल तालुक्यातील  लाभार्थ्यांनी व पारोळा तालुक्यातील लाभार्थ्यांनी अनुदान मिळावे म्हणून आपले अर्ज दाखल केले आहे
लोक डाऊन मुळे हे काम मागे पडले आहे व या योजनेसाठी संजय निराधार योजना कमिटी बरखास्त ही झालेली आहे आता माननीय आमदार चिमणराव आबा पाटील हे या बैठकीत प्रकरण मंजूर करणार आहे अर्ज समाविष्ट केलेल्या लाभार्थ्यांनी आपले अर्ज त्वरित मंजूर व्हावे म्हणून प्रजा न्यूज महाराष्ट्र कडे प्रसिद्धीपत्रक देऊन मागणी केली आहे याविषयी जिल्हा प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी यांनी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांना फोनवर माहिती दिली व संजय गांधी निराधार योजनेची बैठक लावण्याची विनंती केली त्यावर आबासाहेबांनी विनंती मान्य करून आपण त्वरित दोन्ही तालुक्यातील बैठकालावू असे आश्वासन दिले ही माहिती लाभार्थ्यांना देण्यात आल्यावर त्यांनी आमदार चिमणराव बाबांना धन्यवाद दिले व मनपूर्वक आभार मानले

advertising articles 2

-->