-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त करोना बाधित

महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त करोना बाधित

  • महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त करोना बाधित महपालिका प्रशासनात खळबळ आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीत सदर बाब उघड

प्रतिनिधी :योगेश देवपुरकर

 आताच प्राप्त झालेल्या  ४० अहवालात २३ निगेटीव्ह तर ११ पॉझिटीव्ह  अहवाल  आले आहे यातील ६ अहवाल पुन्हा (रिपीट) पॉझिटीव्ह  आले आहेमालेगाव  मनपा  आयुक्त यांचा अहवाल देखील करोना  पॉझिटीव्ह मंत्र्यांन समवेत बैठकीतच  समजला अहवालया बैठकीत अनेक लोकप्रतिनिधी तसेच  अधिकरी  उपस्तित होते

 मालेगाव :- शहरात करोना बधितांची संख्या वाढत असतांना आता येथील महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) यांना करोनाची लागण झाल्याने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अमरावती येथे जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून नेमणूक असलेल्या या अधिकाऱ्याची नुकतीच येथील आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. आपला पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गैरहजर राहिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
संपूर्ण मालेगाव शहर हे करोना महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. आज दुपारी ४० रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून यात २३ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह तर ११ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तसेच यातील ६ अहवाल फेर चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. या ११ रुग्णांमध्ये पालिका आयुक्त व उपायुक्त तसेच दाभाडी येथील २ रुग्णांचा समावेश आहे. शहरात ६०० च्या घरात या विषाणूचे रुग्ण झाले असून यात अनेक डॉक्टर व पोलीस कर्मचा-यांचा देखील समावेश आहे. आता यात महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) यांना देखील बाधा झाल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मालेगाव शहराकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर *आरोग्य मंत्री राजेश टोपे हे मालेगाव शहरात दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीत ना.दादा भुसे व शहरातील सर्व प्रशासन अधिकाऱ्यांसह बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस आयुक्त स्वतः हजर होते. मात्र यावेळी त्यांना आपण स्वतः करोना बाधित असल्याची माहिती मिळताच त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

advertising articles 2

-->