-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेर येथे मका व ज्वारी च्या शासकीय खरेदी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

अमळनेर  येथे मका व ज्वारी च्या शासकीय खरेदी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

अमळनेर  येथे मका व ज्वारी च्या शासकीय खरेदी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


 ता अमळनेर 
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर :  मका व ज्वारी चा शासकीय  खरेदी शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला 300 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून टप्प्याटप्प्याने शेतकरी बोलावण्यात येणार आहेत 
शासकीय भरडधान्य ज्वारी मका रब्बी हंगाम 2019-20 अंतर्गत 1514 शेतकरयांचे कागदपत्रे जमा करण्यात आले असून 300 शेतकऱयांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहेत मात्र गोदाम नसल्याने खरेदी होत नव्हती मात्र तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तात्पुरते शेतकी संघाचे 2000 क्विंटल क्षमता असणारे गोदाम उपलब्ध करून खरेदी सुरू केली आहे 29 रोजी सकाळी 11 वाजता आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून मका व ज्वारी खरेदी शुभारंभ करण्यात आला प्रथम शेतकरी  गोवर्धन येथील अनिल निंबा पाटील यांचाही आमदार पाटील यांनी सत्कार केला त्यांचा 60 क्विंटल मका मोजण्यात आला यावेळी बाजार समिती संचालक विजय प्रभाकर पाटील , एल टी पाटील , शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील , नायब तहसीलदार संतोष बावणे , नायब तहसीलदार आर डब्ल्यू महाडिक , पुरवठा अधिकारी नाना पाटील , कर्मचारी सुभाष पाटील , भिकन पवार हजर होते 
     दरम्यान शासनाकडे बारदान नसल्याने देखील खरेदी करण्यास अडचण होती अखेर महसूल अधिकाऱ्यानी 180  दुकानदारांकडून   प्रत्येकी 100 बारदान मागवले आहेत शेतकऱ्यांना पीक पेऱ्याच्या नोंदणीनुसार मक्याला हेक्टरी मर्यादा 54 क्विंटल आणि ज्वारी ला हेक्टरी साडे एकोणाविस  क्विंटल मर्यादा आहे बारदान उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना ऑनलाईन संदेश देऊन बोलावण्यात येईल त्यानुसारच शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा असे आवाहन शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले आहे

advertising articles 2

-->