-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

बिगर रेशन कार्डधारकांना मोफत धान्ययाची प्रतीक्षा लॉक डाऊन नंतर नवीन रेशन कार्ड मिळण्याची मागणी

बिगर रेशन कार्डधारकांना मोफत धान्ययाची प्रतीक्षा  लॉक डाऊन नंतर नवीन रेशन कार्ड मिळण्याची मागणी

बिगर रेशन कार्डधारकांना मोफत धान्ययाची प्रतीक्षा
लॉक डाऊन नंतर नवीन रेशन कार्ड मिळण्याची मागणी

 प्रतिनिधी = नूरुद्दीन मुल्लाजी

जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य लोकांकडे रेशन कार्ड नाही किंवा रेशन कार्ड होते परंतु "क " वर्गात गेले अशा लोकांनी आपले आधार कार्ड ग्रामसेवक, तलाठी ,व रेशन दुकानदार यांच्याकडे जमा केले आहे मे महिना संपत आला तरी धान्यापासून वंचित राहिले आहे
काही मजूर कामानिमित्त बाहेरगावी गेले होते ते घरी परत आले आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना उपासमारीची वेळ येत आहे शासनाने त्यांना मदतीचा हात म्हणून धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु या मे महिन्यात त्यांना धान्य मिळणार का ?असा सवालही विचारण्यात होत आहे
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना लोक डाऊन च्या काळात मोफत धान्य वितरण  व्हावे व त्यांना शासनाने नवीन रेशन कार्ड देऊन त्यांची कायमची अडचण दूर करावी अशी मागणी होत आहे

advertising articles 2

-->