-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

अमळनेर , येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी देवदूत डॅा. प्रकाश ताळे यांचे डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चे मिशन देवदूत अंतर्गत आभार. नाशिक येथे होणार सत्कार

अमळनेर / प्रतिनिधी सत्तार खान

वैद्यकीय अधिकारी डॅा. प्रकाश ताळे कोरोना साथीच्या
 निर्मुलनासाठी २४ तास मेहनत घेत आहेत. कोरोना जनजागृती करुन डॅाक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचारी यांची कोरोनाशी लढणयासाठी सज्ज टीम तयार करून सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रतिबंधकात्मक साधने, औषधे, उपकरणे इ. उपलब्ध केली. रुग्णांचे सर्वेक्षण करुन लवकरात लवकर बाधीत रुग्ण व त्यांच्या सहवासितांमधुन संक्रमण शोधण्यात आले. त्यामुळे संक्रमण बाधीत भागात बंदिस्त होवून शहराच्या इतर भागांत प्रसार रोखण्यास मदत झाली. बाधीत रुग्णांची संख्या वाढू लागताच तालुकास्तरावर सर्व प्रथम कोविड केअर सेंटर तयार करुन तेथे एकेवेळी जिल्हा रुग्णालयापेक्षा जास्त म्हणजे ७२ बाधीत रुग्णांवर उपचार सुरु केले. तालुकास्तरावर सर्व प्रथम घशाचे स्वॅब घेण्यास सुरुवात करुन एकुण ४३९ स्वॅब तपासणीसाठी पाठविले. कमीत कमी रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्याच्या उद्देशाने शहरी, ग्रामीण व खाजगी डाॅक्टर्स च्या मदतीने म. जिल्हाधिकारी सोा. यांच्या आदेशाने ग्रामीण रुग्णालयात कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित करुन मध्यम स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार अमळनेरातच सुरु करण्यात केले. प्रतिबंधकात्मक व उपचारात्मक उपाययोजनांमुळे नविन बाधीत रुग्णांची संख्या कमी होत असुन लवकरात लवकर तालुका कोरोना मुक्त  करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी ते कटिबध्द आहेत.डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन चे मिशन देवदूत अंतर्गत      देवदूत डॅा. प्रकाश ताळे  याना आभार पत्र पाठविले आहे. कोरोना मुक्त झाल्यावर  देवदूत डॅा. प्रकाश ताळे  यांचा कलाम कुटुंबियांचे उपस्थित नासिक येथे सत्कार करण्यात येईल

advertising articles 2

-->