CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?
मे २५, २०२०
CoronaVirus News : जबरदस्त! कोरोनावर मात करता येणार, कपड्यावर येताच व्हायरस नष्ट होणार?
अमेरिका इंडियाना युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कपड्यांमुळे होणारा संक्रमणाचा धोका कसा टाळता येईल यावर एक उपाय सुचवला आहे.
संशोधकांनी इलेक्ट्रोस्टेटिकचा कोरोना व्हायरसवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. इलेक्ट्रोस्युटिकल्समध्ये माणसांना कोणतीही इजा न पोहोचता कमजोर इलेक्ट्रिक फिल्डचा वापर काही आजार बरे करण्यासाठी केला जातो. शास्त्रज्ञांच्या मते, जर कपड्यांवर इलेक्ट्रिक फिल्ड निर्माण केलं, तर त्यावरील व्हायरस नष्ट होऊ शकतो.
शास्त्रज्ञांनी करंट निर्माण करणारा एक कापड तयार केलं आहे. या करंटमुळे त्या कपड्यावरील व्हायरसचा नाश होईल आणि संक्रमण पसरण्यापूर्वीच कपडा व्हायरसमुक्त होईल. या संशोधनाचे प्रमुख अभ्यासक आणि इंडियाना सेंटर फॉर रिजनरेटिव्ह मेडिसीन अँड इंजिनीअरिंगचे संचालक चंदन सेन आणि त्यांच्या टीमने इलेक्ट्रोस्युटिकल कापडाला पीपीई किटसाठी अधिक उपयोगी म्हटलं आहे. तसेच कोरोना व्हायरसपासून बचावासाठी कपड्यांवर अभ्यास सुरू केला आहे.
अभ्यासात मास्कवर सर्वात जास्त भर दिला जातो आहे . शास्त्रज्ञांनी मास्कवर व्हायरसचा नाश कसा होईल आणि त्याला हात लावल्यानंतर संक्रमण पसरणार नाही असा मास्क बनवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र कपड्यांमार्फतही कोरोना व्हायरस पसरतो. व्हायरस असलेल्या कपड्यांना हात लावल्यानंतर असे हात तोंडाला लावले तर कोरोना शरीरात प्रवेश करण्याचा धोका वाढतो. मात्र या संशोधनानंतर आता कपड्यांपासून होणारा संक्रमणाचा धोका टाळता येईल अशी आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.