सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथील एका ३५ वर्षाच्या इसमाने ३१ वर्षे वयाच्या सालीसह मोनोसिल नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
जून १८, २०२०
सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथील एका ३५ वर्षाच्या इसमाने गोराडखेडा तालुका पाचोरा येथील पी जे रेल्वे गेट पासून १०० मिटर अंतरावर ३१ वर्षे वयाच्या सालीसह मोनोसिल नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
सोयगाव/प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथील एका ३५ वर्षाच्या इसमाने गोराडखेडा तालुका पाचोरा येथील पी जे रेल्वे गेट पासून १०० मिटर अंतरावर ३१ वर्षे वयाच्या सालीसह मोनोसिल नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दी.१७) घडली.
मयताचा मोठा भावाचे गेल्या वर्षी निधन झाल्याने मोठ्या भावजयीशी विवाह झाला होता.धानोरा तालुक्यातील माहेर असलेल्या व गहूखेडा तालुका मलकापूर येथील विवाहित मेव्हनिशी दिनांक १७ रोजी बहूळानदी तिरा लगत असलेल्या शिव मंदीरात फुलमाळा घालून विवाह केला होता.असे नातेवाईकांनी सांगीतले मात्र विवाहाच्या दिवशी काही तासातच दोघांनी विष घेऊन आत्महत्या केली या विवाहास समाज व नातेवाईक मान्यता देणार नाही. या मूळे त्यांनाआत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, युवतीस गहुखेडा येथील पहिल्या घरचा एकवर्षाचा मुलगा आहे,सोयगाव तालुक्यातील घाणेगाव येथील उमेश हरी शेळके हा पुणे येथे मोटारसायकल दुरुस्ती करण्याचे काम करीत होता.मोठ्या भावाचे निधन झाल्या पासून तो धानोरा येथे घरची शेती पहात असे, गेल्या वर्षी त्याचा मोठा भावाचे निधन झाल्यानंतर उमेशने नातेवाईक व आईच्या सांगण्यावरुन मोठ्या भावजयीशी वैवाहिक संबंध ठेवले.
गेल्या दोन दिवसांपुर्वी त्याची लहान मेव्हणी व मयत मेव्हणी पिंकी हिच्या बहिणिचा गहूलखेडा येथे साखरपुडा होता, लहान बहिण तिच्या पतीच्या लहान भावाशीच सोयरिक झाल्याने तीला दिरानी म्हणून येणार होती.साखरपुडा आटोपल्यानंतर मेव्हणी पिंकी,त्याची पत्नी व तो असे तिघेजण घाणेगाव तालुका सोयगाव येथे तिघेजण मोटरसायकल वर आले दुसऱ्या दिवशी मी पिंकीला गहूलखेडा येथे तिच्या सासरी सोडून येतो असे पत्नीस सांगून ते निघाले होते.
उमेश याचे मोठ्या भावजयीची बहिण पिंकी हिच्याशी त्याचे आधीपासूनचअनैतिक संबंध असल्याने,त्यांनी गहुखेडा येथे न जाता पाचोरा तालुक्यातील बहुळा नदी काठच्या शिव मंदीरात माळा घालून प्रेम विवाह केला.
पिंकी हीस पहिल्या पती पासून एक वर्षाचा एक मुलगा आहे, दिनांक १७ रोजी पिंकी व उमेश याने पाचोरा तालुक्यातील गोरागखेडा शिवारातील पी जे रेल्वे गेट पासून सुमारे १०० मिटर अंतरावर यू पी सी मोनोसिल नावाचे एक लिटर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
विषारी औषध सेवनानंतर उमेश याचा प्राण जाताजात नव्हता त्यास होणाऱ्या यातनामूळे तोंड जमिनिवर घसरुन जमिनीला अर्धा फुट खड्डे पडले आहे तर पिंकीचे पाय घसरून घसरुन वाकडे झाले होते. दिनांक १६ रोजी पाचोरा तालुक्यातील अतीवृष्टी झाल्याने बहूळा प्रकल्पात असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी पाण्यात बुडतील म्हणून गोराडखेडा येथील पाच सात शेतकरी पी जे रेल्वे लाईन पासून प्रकल्पाकडे जात असतांना शेतकरी भैय्या ओंकार पाटील याचे निदर्शनास दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलिस पाटील संजय रामचंद्र पाटील याना भ्रमणध्वनी द्वारे कळविले, पोलीस पाटील संजय याने सदरची माहिती पाचोरा पोलीसांना कळविल्याने सहायक फौजदार चंद्रकांत पाटील,कॉनष्टेबल सचिन पाटील,किरण पाटील,वसंत पाटील यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. यावेळी पोलीसांना प्रेमी युगुल जोडप मृत अवस्थेत आढळून आले,व त्यांचे जवळ एक लिटर मोनोसिलचा डबा, एक डायरी,पेन आणि दोघांच्या गळ्यात झेंडुच्या फुलाच्या माळा आणि मोबाईल आढळूनआल्या.त्या मोबाईल मधे उमेश याचा काका कैलास त्र्यंबक शेळके याचा मोबाईल नंबर असल्याने पोलिसांनी काका कैलास शेळके यांना बोलावून घेतले, घटनेची खबर कैलास शेळके यांनी पोलीसांना दिली. घटनेचा तपास चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.
घटनेमुळे तिघांचे संसार उद्धवस्त तर एक वर्षाच्या बालक उघड्यावर :
उमेश शेळके व त्याची मेव्हणी पिंकी यांनी पळून जाऊन प्रेम विवाह करुन आत्महत्या केली मात्र या घटनेमुळे पिंकिंचा एक वर्षाचा बालक उघड्यावर पडला आहे.
पिंकीचा पती,तिची नुकताच साखरपुडा झालेली लहान बहिण,व घाणेगाव येथील मोठी बहीण असे तिघांचे संसार उद्धवस्त झाले,तर पिंकी व उमेश यांनाही जीव गमवावा लागला आहे, पिंकीचा पती,तिची नुकताच साखरपुडा झालेली लहान बहिण,व घाणेगाव येथील मोठी बहीण असे तिघांचे संसार उद्धवस्त झाले,तर पिंकी व उमेश यांनाही जीव गमवावा लागला आहे,