भीषण अपघातात अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू

भीषण अपघातात अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू

भीषण अपघातात अमळनेरच्या दोन तरुणांचा मृत्यू  

मोटरसायकलीने शिर्डीहुन अमळनेरला परत येत असताना त्यांना ट्रक ने धडक दिली त्यात झामी चौक व बालाजीपुरा येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला.  

अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान
मालेगाव-पुणे रोडवरील जळगांव चोंडी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.
अमळनेर येथील झामी चौकातील विकास ईशी(वय 29),बालाजीपुरा भागातील गणेश चौधरी(वय 32),प्रीतम ठाकूर(वय30), व चंद्रकांत पाटील हे चौघे प्रितम चा भाऊ हर्षल ठाकूर यास घ्यायला मोटारसायकल ने शिर्डी येथे गेले होते.हर्षल पुण्याहून मोटारसायकल ने शिर्डी पर्यंत आला होता. शिर्डीहून पुढे परततांना विकासला मोटारसायकल चालवता येत नसल्याने प्रितमने ने गाडी चालवण्यास घेतली व गणेश त्याला पाठीमागे धरून बसला होता. तिघे एकाच मोटारसायकल ने परत निघाले हॉटेबतर चंद्रकांत आणि हर्षल दोघे वेगळ्या मोटारसायकल ने पुढे निघाले होते.मालेगाव जवळील जळगांव चोंडी गावाजवळ एका ट्रक ने धडक दिल्याने एका मोटारसायकल वर असलेले विकास ,गणेश,प्रितम खाली कोसळले.त्यात विकास जागीच ठार झाला होता तर गणेश व प्रितम ला मालेगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले असता गणेश चा देखील मृत्यू झाला.तर प्रितम वर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.