तलाठी व मंडळ अधिकारीयांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपीस अटक न झाल्यास लेखनी बंद आंदोलनचा इशारा प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

 ता अमळनेर 
प्रतिनिधी // सत्तार खान
अमळनेर-- तालुक्यातील कावपिंप्री येथे दि 16 रोजी दुपारी 2.00 वाजता अवैध गौणखनिज वाहतुक करणाऱ्यावर कारवाई करणेसाठी तहसिलदार अमळनेर यांच्या तोंडी आदेशान्वये श्री पी एस पाटील,श्री अशिष पारधे , श्री प्रथमेश पिंगळे,श्री व्ही पी पाटील हे अवैध
गौणखनिज कारवाईस गेले असता त्यांचेवर गावातील गाव तलाव रस्त्यावर प्राणघातक हल्ला केला,हल्लयात तलाठी यांचे खाजगी वाहनाचे नुकसान करून तलाठी यांना दुखापत देखील केलेली आहे, तलाठी व मंडळ अधिकारी यांचेवर देखील अशाप्रकारचे प्राणघातक हल्ले अगोदर झालेले आहेत,तरी सदरच्या घटनेच्या विरोधात
अमळनेर तालुका तलाठी संघटना तीव्र निषेधार्थ निवेदन देवून सदर घटनेतील आरोपीला अटक न केल्यास दोन दिवसानंतर अमळनेर तलाठी संघाने नैसर्गिक आपत्ती , कोविड - 19 व आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत येणारी कामे वगळुन इतर कार्यालयीन कामकाज लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशाराचे निवेदन प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले आहे............................