चुकलेली वाट वळणावरपा लकांना वाटू लागली गावची शाळा चांगली
चुकलेली वाट वळणावरपा लकांना वाटू लागली गावची शाळा चांगली
ता.भातखंडे
पाचोरा भातखंडे कोरोनाविषाणूच्या महामारीत अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले दिसून येत आहे. त्यातल्या त्यात खास करून शैक्षणिक क्षेत्रात देखील अमुलाग्र बदल होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागाला नेहमीच शहरी भागातलं शिक्षणाविषयी अधिक आकर्षण राहिलेले आहे. म्हणूनच तर सेमी इंग्रजी सी बी एस सी माध्यमाच्या शाळांकडे ग्रामीण पालक देखील मोठ्या प्रमाणात आकर्षिले गेले. परंतु शिक्षण क्षेत्राला आलेलीओहटी चे आता तिचे भरतीत रूपांतर व्हायला सुरुवात झालेली दिसून येत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे यावर्षी सहामाही नंतर शैक्षणिक वर्ष नावालाच होते. त्यात वार्षिक परीक्षा झाल्याच नाही म्हणून पालक चिंतेत होते. यात आपल्या पाल्यांचे भवितव्य काय ते पुढच्या वर्षी पुढच्या वर्गात जातील किंवा नाही ही संभ्रमावस्था कायम होती परंतु शिक्षण क्षेत्राने याबाबत निर्णय घेऊन सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठवले आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला परंतु हा विषय तेवढ्यावरच थांबला नाही. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले परंतु कोरोनाविषाणू मात्र पाठलाग करणं सोडत नाही आता पालकांसमोर आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याविषयी चिंता वाटू लागलेले आहे. सद्य स्थितीत शाळांनी फक्त ऑनलाईन, व्हॉट अपवर शिक्षण दयायलासुरवात केली आहे परंतु ते शिक्षण ग्रामीण भागात असून नसल्या सारखे आहे या वर्षांत प्रत्यक्ष शाळा टप्याने सुरू होणार आहेत.
.त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या खच्चून भरून येणाऱ्या गाड्या आता थांबणार असल्याने चित्र दिसतआहेत. त्यामुळे आता पालकांना शहरी भागात पाल्यांना पाठवण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे आता ती त्यांना अडचण वाटत आहे आणि आपोआपच त्यांना आपल्या गावची शाळा आता आठवायला लागलेली आहे.आणि ते आता म्हणत आहेत "गड्या आपली गावची शाळा बरी" आपली गावची शाळा देखील आपल्या मुलाला किंवा मुलीला चांगले दर्जेदार शिक्षण देऊ शकते हे त्यांना आता कळू लागले आहे. आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं किंवा शहरातल्या मोठ्या शाळांविषयी असलेले आकर्षण कोरोनाच्या निमित्ताने का होईना !! कमी व्हायला लागलेला आहे आणि शैक्षणिक क्षेत्राला आलेली ही ओहोटी कमी झालेली आहे .आणि कोरोनामुळे शहराकडे पाठवण्याचा कल बदललेला असून पालकांनी शहरी भागातील शाळांकडे पाठ फिरवली असून त्यांना पाल्याची विषयी शिक्षणापेक्षा आरोग्याची अधिक काळजी वाटायला लागली आहे. म्हणूनच की काय कोरोनामुळे पालकांचा आपल्या पाल्यांना शहराकडे पाठवण्याचा कल बदललेला असून पालकांना आपल्या पाल्याची विषयी शिक्षणापेक्षा आरोग्याची अधिक काळजी वाटायला लागली आहे .तसेच शाळा शिक्षक ,संस्थाचालक, मुख्याध्यापक, , यांनी चांगल्या पैकी मनावर घेतले असून शहरी भागा इतकेच ग्रामीण भागात देखील अधिक दर्जेदार शिक्षण मिळू शकते याबाबतची विश्वासार्हता आता निर्माण झाली आहे , ग्रामीण भागातील पालकांना आता कळायला लागले आहे म्हणून शहरी शाळांचे आकर्षण कमी झालेले असून बहुतांश पालक स्वतःहून इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम पाचोरा किंवा अन्य ठिकाणी टाकलेल्या आपल्या मुला-मुलींना गावाच्या शाळेत प्रवेश घेतानाचा कल दिसून येत आहे आणि त्यांचे मुले-मुली स्वतःहून पालकांना सांगत आहे पप्पा आता आम्हाला आपल्या गावच्या शाळेतच शिकायचे आहे असे ते आता सांगताना दिसत आहे.
0 Response to "चुकलेली वाट वळणावरपा लकांना वाटू लागली गावची शाळा चांगली"
टिप्पणी पोस्ट करा