-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात अभाविपचा रास्ता रोको!

 एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात अभाविपचा रास्ता रोको!

प्रजा न्युज प्रतिनिधी दिपक पवार धुळे,नाशिक

महाराष्ट्र सरकारने सलग पाचव्यांदा एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याच्या निर्णयाविरोधात नाशिक तर्फे कॉलेज रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

       महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या नियोजित परीक्षा या महाराष्ट्र सरकारने सलग पाचव्यांदा कोरोनाचे तुटपुंजे कारण देऊन यापूर्वी कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीमुळे तसेच इतर कारणांमुळे यापूर्वी महाराष्ट्र सरकारने परीक्षा पुढे ढकलल्या. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षांची तयारी करत असतात परंतु वेळेवर या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागून राहिले आहे. याच कारणावरून अभाविप  नाशिक तर्फे महाराष्ट्र सरकार विरोधात कॉलेजरोड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पुढे परीक्षा या नियोजित वेळेतच घेण्यात याव्या व विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये अन्यथा यापेक्षाही तीव्र स्वरूपात महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा अभाविप नाशिक पुणे या आंदोलनाच्या माध्यमातून दिला.  गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र शासनाची शिक्षणक्षेत्रातील उदासीनता ही ठळकपणे दिसून आली आहे, शेवटच्या वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून असेल किंवा अभ्यासिका बंद करून ठेवणे असो हे शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. यामध्येच राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा सलग अनेकवेळा रद्द होणे दुर्दैवी आहे आणि जे विद्यार्थी वर्षानुवर्ष लाखो रुपये खर्च करून या परीक्षेची तयारी करत असतात त्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे हा निर्णय त्वरित मागे न घेतले घेतल्यास अभाविप महाराष्ट्र भर आंदोलन पेटवेल.

- विराज भामरे 

(प्रदेश सहमंत्री, अभाविप महाराष्ट्र प्रदेश)







advertising articles 2

-->