-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

सेन्ट्रल बँकेत होणारी नागरिकांची गर्दी देऊ शकते कोरोनाला आमंत्रण ?-पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

सेन्ट्रल बँकेत होणारी नागरिकांची गर्दी देऊ शकते कोरोनाला आमंत्रण ?-पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

कासोदा प्रतिनिधी दीपक शिंपी

 कासोदा, ता.एरंडोल सगळीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना येथील एकमेव राष्ट्रीय कृत सेन्ट्रल बँकेत नागरिकांची होणारी गर्दी पाहता कोरोनाला स्वतःहुन आमंत्रण देण्याचेच ठरेल.पोलीस प्रशासन रात्री 7 नंतर गावातील दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत असतात. मग दिवसा बँकेत होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष कसेकाय करू शकतात.बँकेजवळ ह्या काळात पोलीस बंदोबस्त ची गरज असून नागरिक इतरांचे ऐकेनासे झाले आहेत. त्याठिकाणी बँकेनेही स्वखर्चाने एक कर्मचारी लोकांना सॅनिटायजर हातावर टाकण्यासाठी व डिस्टन्स ठेवण्यास मदत करणेसाठी नेमण्याची आवश्यकता असताना बँकेने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते.याचा भुर्दंड गरीब निष्पाप लोकांना बसणार असून एखाद्या गरीबाला कोरोनाच्या लागण झाल्यास त्याचा खर्च कोण उचलणार व त्याची जबाबदारी बँक प्रशासन घेईल का असा सवाल सुद्न्य नागरिक विचारत आहेत.


advertising articles 2

-->