आज जिल्ह्यात ११९६ कोरोना रूग्ण; चोपडा तालुका आघाडीवर
प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी
जळगाव- 24 तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ११९६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून चोपड्यातील रूग्णांची संख्या ही आता धोकादायक प्रमाणावर गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर आजच तब्बल १५ रूग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
जळगाव शहर-२५२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-९९, अमळनेर-९५, चोपडा-३६२, पाचोरा-३०, भडगाव-९, धरणगाव-६७, यावल-३५, एरंडोल-२८, जामनेर-८४, रावेर-२८, पारोळा-२५, चाळीसगाव-४०, मुक्ताईनगर-१, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील १० असे एकुण १ हजार १९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे
आजच्या कोरोना अहवालात दिवसभरात १ हजार १९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात एकुण ८३ हजार १६५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी ७० हजार ८७७ रूग्ण बरे हावून घरी परतले आहे. तर १० हजार ७३४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. नागोराव चव्हाण यांनी माहिती दिली.