-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

पिंपळगांव कमानी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीवर पडला विद्युत खांब

पिंपळगांव कमानी येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीवर पडला विद्युत खांब

(विज वितरण कंपनीचा गलथान कारभार,थोडक्यात जिवीतहानी टळली)

प्रतिनिधी प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण

पहूर,ता.जामनेर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी(तांडा) येथील जि.प.प्राथमिक शाळेतील एका 

वर्गखोलीवर मुख्य रस्त्यावरील आणि विद्यमान सरपंच यांच्या घरासमोरील वाकलेल्या विज वितरण कंपनीने उभारलेल्या खांबाचा तोल जाऊन पडला.

   हा खांब साधारणतः ३ महिन्यापासून म्हणजे जानेवारी महिन्यात झालेल्या वादळी वार्याने वाकलेला होता.याविषयी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक-श्री.मोहितेसर यांनी येथील विज वितरण कंपनीचा स्थानिक प्रतिनिधी नामे-सलिम वायरमन यांना तसे पत्र देखील दिले होते.परंतु या मुख्य रस्त्यावरील खांबाकडे या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.असेच दिसून येते.या विषयी जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,माजी ग्रामपंचायत सदस्य-मा.अशोकभाऊ चव्हाण,ग्रामपंचायत सदस्या तथा संस्थेच्या संचालिका-सौ.अनुसया चव्हाण,सचिव-विठ्ठलभाऊ चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य-कैलासभाऊ चव्हाण यांनी शाळेतील शिक्षक यांच्याकडे  अधिक चौकशी केली मा.मुख्याध्यापक-श्री.मोहिमेसर यांनी वरील माहिती दिली.

बरे झाले आज कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहे म्हणून कुठल्याही प्रकारची इतर दुर्घटना झाली नाही.जर शाळा सुरु असती तर मोठी दुर्घटना घडली असती आणि या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न आता भेडसावत आहे विशेषतः हा खांब या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचसाहेबा-सौ.प्रियंका चव्हाण यांच्या राहत्या घरासमोर असून या सरपंचसाहेब यांना सुद्धा हा खांब दिसला नसावा काय? की,यांनी पण या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले? असे कित्येक प्रश्न पडत आहेत.

 या घटनेची तात्काळ चौकशी करावी आणि संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी,अन्यथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्युत वितरण कंपनीवर समस्त संचालक तसेच कार्यकर्त्यांतर्फे घेराव घालून आंदोलन करण्यात येईल असा इशारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,सचिव-विठ्ठलभाऊ चव्हाण,संचालक-विकासभाऊ चव्हाण,गणेशभाऊ राठोड,तुकाराम चव्हाण,अजय पवार,संदिपभाऊ राठोड,प्रविण चव्हाण,यांच्यासह ग्रामपंचायत चे उपसरपंच-काळूदादा राठोड,ग्रामपंचायत सदस्य-कैलासभाऊ चव्हाण,सदस्या सईबाई चव्हाण यांनी केला आहे




advertising articles 2

-->