-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

अहमदनगर प्रतिनिधी : सुनिल नजन 

अहमदनगर जिल्ह्यातील चितळी ता. पाथर्डी येथील उद्धव कानिफनाथ शेळके (वय २५) या तरुणाने कासार पिंपळगाव हद्दीतील सर्वे नं ६१ मधील नगर शेवगाव रोड वरील फॉरेस्ट मधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. साधारणपणे दुपारी एक ते दीड च्या दरम्यान त्याने हा प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी गुरे चारणाऱ्या गुराख्यांनी सदर घटनेची खबर मोबाईल वरून सर्वत्र पसरल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी जमली होती व या मृत्यू बद्दल अनेक तर्क वितर्क काढत होते. नेमके त्याने का आत्महत्या केली याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. 

उद्धव शेळके हा आदिनाथनगर ता. पाथर्डी येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घरून निघताना महाविद्यालयात जातो असे सांगून गेला. परंतु तो महाविद्यालयात न जाता दुकानातून नायलॉनची दोरी खरेदी करून महविद्यालायापासून १ किमी अंतरावर असलेल्या हॉटेल शुभम शेजारील सर्वे नं ६१ मधील दऱ्या खोऱ्याचा परिसर असलेल्या भागात गेला व कोणाच्याहि  नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी अशा झाडाची निवड करून त्या झाडाला गळफास घेतला. गळफास घेतलेल्या झाडा जवळच त्याचे दुचाकी वाहन आढळून आले. सदर तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाथर्डी येथील सरकारी ग्रामीण आरोग्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. उत्तरीय तपासणी नंतर मोठ्या शोकाकुल वातावरणात चितळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे महाविद्यालय हे अतिशय उत्कृष्ट व विद्वान विद्यार्थी घडविलेले महाविद्यालय म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. परंतु याच विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने का आत्महत्या करावी हे एक न समजणारे कोडे आहे. 

याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला ४२/२०२१ कलम १७४ प्रमाणे  आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. तांबे व अमोल कर्डिले हे करीत आहेत.






advertising articles 2

-->