-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

एरंडोल तालुक्यात 99 नवीन रुग्ण कोरोना पोसिटीव्ह

एरंडोल तालुक्यात 99 नवीन रुग्ण कोरोना पोसिटीव्ह

प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी

एरंडोल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मंगळवारी घेण्यात आलेल्या शिबिर मध्ये व नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या 97 रुग्णाची टेस्ट घेण्यात आल्या

यामध्ये शहरातील 26 व ग्रामीण भागातील 13 तसेच शहरात दोन रिक्षामध्ये मोबाईल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

 ही मोबाईल रिक्षा शहरातील विविध ठिकाणी उभी राहून त्या ठिकाणी नागरिकांची तपासणी करण्यात येत होती यामध्ये पहिल्या मोबाईल दीक्षा मध्ये 62 नागरिकांच्या टेस्ट घेण्यात आलेल्या या यामध्‍ये 13 व दुसऱ्या मोबाईल रिक्षामध्ये 57 टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये 14 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे असे शहरातूनच 216 टेस्ट घेण्यात आले यामध्ये 55 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत

ग्रामीण भागातील रिंगणगाव येथे घेण्यात आलेल्या 84 टेस्टमध्ये 12, कासोदा येथे घेण्यात आलेल्या 222 टेस्टमध्ये 16 व  आरटीपीआर मध्ये 1व तळई येथे घेण्यात आलेल्या एकूण 39 टेस्टमध्ये 2 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे ग्रामीण भागात 43 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे एरंडोल शहर व तालुक्यात 99 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आढळून आला आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे


advertising articles 2

-->