आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून अनंत धाकू डोहाळे यांना मिळाले जीवनदान
एप्रिल २५, २०२१
नाव : अनंत धाकू डोहाळे वय : 66 राहणार : उंबर्डे. कल्याण ( पश्चिम )
अनंत डोहाळे यांना अचानक रात्री छाती मध्ये दुखायला सुरुवात झाली. त्यांना तात्काळ एका जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना ईसीजी व बाकीचे रिपोर्ट केले. डॉक्टर ने त्यांना एन्जोग्राफी करायला सांगितले. पण त्या हॉस्पिटलमध्ये ऍन्जिओग्राफी करण्याची सुविधा नसल्यामुळे. त्यांना बाहेरून ऍन्जिओग्राफी करायला सांगितले. पण अनंत डोहाळे यांची आर्थिक परिस्थिती नसल्याकारणाने. त्यांना कमी खर्चामध्ये अँजिओग्राफी करून देण्यासाठी कोणी तयार नव्हते. अनंत डोहाळे यांची प्रकृती जास्तच खराब होत चालली होती. आणि सर्वीकडे कोरणा पॅशन असल्याकारणाने त्यांना कोणी ऍडमिट करायला तयार नाही होत होते. आणि भरपूर हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजनची कमी असल्याकारणाने त्यांना ऍडमिट करण्यासाठी नाकारत होते.अनंत डोहाळे यांचा मुलगा त्याने जवळचा मित्र तुषार खैरे (समाजसेवक )यांना संपर्क केला. तुषार खैरे यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे श्री जितेंद्र पाटील यांना संपर्क केला. जितेंद्र पाटील यांनी अनंत डोहाळे यांचे रिपोर्ट व्हाट्सअप द्वारे मागून घेतले. आणि त्यांना लगेच छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा या ठिकाणी जाण्यास सांगितले. हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्यांना तात्काळ बेड उपलब्ध करून दिला. आणि त्यांचे तात्काळ ऍन्जिओग्राफी करण्यात आली. डॉक्टरांनी ऍन्जिओग्राफी रिपोर्ट बघून ब्लॉक आहेत व त्यांना एन्जोप्लास्टी करण्याची सल्ला दिली. अनंत डोहाळे यांच्या मुलाने श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. आणि त्याच्या वडिलांना एन्जोप्लास्टी करायला सांगितलेले आहे असं त्यांनी सांगितले. पण जितेंद्र पाटील यांनी अनंत डोहाळे यांच्या मुलाला सांगितले तुम्ही घाबरू नका तुम्हाला कुठेही खर्च न देता सर्व तुमचे मोफत मध्ये होणार आहे. हे ऐकून अनंत डोहाळे यांची एन्जोप्लास्टी करण्यात आली. ऑपरेशन सर्व सक्सेसफुल झाल्यानंतर. त्यांना सात ते आठ दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. आणि त्यांच्याकडून कुठलाही प्रकारचा खर्च न घेता सर्व मोफत मध्ये करण्यात आले. अनंत धाकु डोहाळे आता आपला परिवार बरोबर एकदम सुखरूप घरी आहेत. डोहाळे परिवार यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे श्री जितेंद्र पाटील यांचे खूप खूप आभार मानले