-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्यांना चटका

खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्यांना चटका

सोयगाव तालुका प्रतिनिधी:-अज्ञानसिंग चव्हाण

पूर्ण जगभरात कोरोना महामारी चे संकटात  असतानाच भारतात मात्र महागाईने कळस गाठला आहे .मोठ्या प्रमाणावर असणारी बेरोजगारी आणि वाढती महागाई यात सर्वसामान्यांना मात्र याचे चटके सोसावे लागत आहेत मागच्या वर्षी सोयाबीन तेलाचे भाव हे ७८ ते ८० रुपये प्रति किलो होते मात्र तेच भाव यावर्षी दुप्पट म्हणजे १६० रुपये प्रति किलो झाल्याने सर्वसामान्य माणूस, मजुरी करणारा वर्ग त्रस्त झाला आहे आता सोयाबीन असो कि शेंगदाणातेल सर्वच खाद्यतेलांचे भाव चांगलेच वाढले आहे. आरोग्याच्या दृष्टीने डबल व ट्रीपल फिल्टर खाद्यतेलाला चांगलीच मागणी असते. मात्र विविध कारणांनी खाद्यतेलाच्या भाववाढ सर्वसामान्यांचे चिंता वाढविणारी बाब ठरली आहे.

आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट बळावले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंब करीत असले तरी वर्षभरापासूनचे हे रडगाणे संपायचे नाव घेत नाही.

अजूनही त्यात वाढ होणार काय, अशीच चर्चा बाजारपेठेत ऐकावयास मिळत आहे. प्रत्येकच वस्तू महाग होत असेल तर बजेटमध्ये घर चालवायचे तरी कसे असा प्रश्न गृहिणींसमोर निर्माण झाला आहे. आधीच गॅस सिलिंडर्सच्या दरामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे आगीत अजून तेल ओतण्याचे कार्य सुरु आहे काय, असेच जाणवायला लागलेआहे. यावर गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
आयातीवरील कर सरकारने कमी केले तरच तेल आणि डाळींचे भाव कमी होतील. डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च पण वाढला हे ही एक कारण आहे.
आधीच लॉकडाऊनमुळे बेरोजगार, आणि आता महागाईचे हे चटके नकोसे झाले आहेत. महागाईवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही असाच प्रश्न त्यांना पडला असून लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष घालावे आणि दिलासा द्यावा अशीच मागणी सर्वसामान्य करत आहे
इंधन दरवाढ, आयातीवरील कर आणि कमी उत्पादन या कारणांमुळे किराणा मालाचे भाव वाढल्याचं, किराणा दुकानदार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपध्यक्ष दिनेशजी चोपडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
ग्रामीण भाग असो की शहरी. तेल ही जीवनावश्यक वस्तू आहे. तेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्य किराणा दराच्या साहित्यातही वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे चोपडे आप्पा बोलले.

advertising articles 2

-->