-->

BREAKING NEWS SCROLL

BREAKING
बातमी लोड होत आहे...

सावळदबारा येथील गावकऱ्यांनी रोखला कोरोना वेशीबाहेर

सावळदबारा येथील गावकऱ्यांनी रोखला कोरोना वेशीबाहेर


एकजुटीचे दर्शन: दुसऱ्या लाटेतही कोरोनाचा शिरकाव नाही

सोयगाव तालुका प्रतिनिधी:-अज्ञानसिंग चव्हाण

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा या गावाला चौदा ते पंधरा गावे समाविष्ट करण्यात आले असून सावळदबारा ग्रामपंचायत हाद्दीत येथील माझे कुंटुंब माझी जवाबदारी प्रभावीपणे अंमलबजावणी  कोरोना वेशीबाहेरच ठेवण्यात आतापर्यंत यश मिळाविले आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथे एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या लाटेतही येथे कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.

येथील ग्रामस्थांनी स्वतःची काळजी घेऊन कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाले आहे. विशेष म्हणजे सावळदबारा हे गाव तीन जिल्ह्याच्या सिमेवरती असून आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण आढळून येत असताना सावळदबारा येथील एकही रुग्ण अद्याप पर्यंत पाँझिटिव्ह आढळून आला नाही.

येथील ग्रामस्थ नियमित मास्क,सँनिटाइजर,सुरक्षित अंतर ठेवून स्वतः ची काळजी घेत असल्याने हे शक्य झाल्याचे येथील सरपंच सौ.स्वाती भाऊराव कोलते,वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.पी.राजपूत, पो.पाटील विलास कुल्ले उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान,म्हणणे आहे. शासनाने जनजागृती केली आहे. तर सावळदबारा येथील ग्रामपंचायती कडून वेळोवेळी पुर्ण गावात सँनिटाइजर फवारणी चालू असते.

ग्रामस्थ गावात कोरोना पसरू नये म्हणून कोरोनाचे सर्व नियम पाळत असून तीन जिल्ह्यातीच्या सिमेवर असूनही येथे कोरोनाचा शिरकाव अद्याप पर्यंत झाला नाही. याचे श्रेय गावकऱ्यांना जाते.

समाजसुधारक प्रा.जिवन कोलते(पाटील)सावळदबारा.

advertising articles 2

-->