बेमोसमी पावसामुळे शेतकरी चिंतेत
एप्रिल ३०, २०२१
(बागलान) प्रतिनिधी:- अजय ठाकरे
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका बागलानसह काही भागात डांगसौदाणे, वड्याचे पाडे, सकोडे या परीसरात दि.३० रोजी सायंकाळी ४:३० वाजता अवकाळीच्या पाऊसाने हजेरी लावलेली. असल्याने उघड्यावर असलेले कांदा, यांची नुकसान झाली. सटाणा शहरसह बागलाण तालुक्यातील काही भागात आज शुक्रवार दि.३० रोजी सायंकाळी ४:३० ते ४:५५ वाजेच्या सुमारास प्रंचड विजेचा कडकडाट- धडपडआठ आवाजाने व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परिसरात दोन ते ३ तीन दिवसांपासून उन्हाच तडाखा व मध्येच ढगाळ वातावरण दिसून येते आहे. तसेच २ ते३ दिवसांपासून रोज संध्याकाळी विजांचा कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरूवात होते. पण दि.३० रोजी वादळी वाऱ्यासह गारपिटीने व विजांचा प्रचंड कडकडाट - गडगडाट आवाजानेच जोरदार पाऊसाने हजेरी लावली . त्यामुळे शेतकऱ्याचे धावपळ झाली. आत सध्या शेतीमध्ये टामटा, कोबी कोथिंबीर, आंबा हे पिके जोमात होते. पण मात्र या बेमोसमी पावसामुळे याची प्रचंड प्रमाणात नुकसान झाली आहे.